IPL 2025 GT vs SRH Live Streaming: हैदराबादकडे पराभवाची परतफेड करण्याची संधी, गुजरातवर मात करणार का?
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Live Streaming : गुजरात टायटन्स शुबमन गिल याच्या नेतृत्वात आयपीएल 2025 मधील आपला 10 वा सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे. जाणून घ्या सविस्तर

आयपीएल 2025 मधील 51 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. गुजरात आणि हैदराबाद या दोन्ही संघांचा आयपीएलच्या 18 व्या मोसमातील हा दहावा सामना असणार आहे. पॅट कमिन्स हैदराबादचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरातच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे.दोन्ही संघांची ही या मोसमात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. गुजरातने याआधी हैदराबादवर 6 एप्रिलला 7 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे हैदराबादकडे या पराभवाची परतफेड करण्याची संधी असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरातचा हैदराबादवर सलग दुसऱ्यांदा मात करुन प्लेऑफच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या लढतीत कोण सरस ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना केव्हा?
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना गुरुवारी 2 मे रोजी होणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना कुठे?
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटव्रकवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद लाईव्ह मॅच मोबाईलवर कुठे पाहता येणार?
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दोन्ही संघांची स्थिती
गुजरात टायटन्सने या मोसमात आतापर्यंत एकूण 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुजरात 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. तर हैदराबादला 9 पैकी फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे हैदराबादला प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर उर्वरित 5 सामने जिंकावे लागतील. त्यामुळे हैदराबादसाठी इथून प्रत्येक सामना हा करो या मरो असा असणार आहे. त्यामुळे हैदराबादसाठी हा सामना फार महत्त्वाचा ठरणार आहे. अशात हैदराबाद गुजरात विरुद्ध कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
