AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs PBKS : नंबर 5 आणि 7 आमनेसामने, पंजाब किंग्सचा केकेआरविरुद्ध बॅटिंगचा निर्णय

Kolkata Knight Riders vs Punjab Kings Toss And Playing Eleven : पाहुण्या पंजाब किंग्स टीमने इडन गार्डन्सध्ये टॉस जिंकून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण?

KKR vs PBKS : नंबर 5 आणि 7 आमनेसामने, पंजाब किंग्सचा केकेआरविरुद्ध बॅटिंगचा निर्णय
Ajinkya Rahane and Shreyas Iyer KKR vs PBKS TossImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 26, 2025 | 7:44 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 44 व्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमेनसामने आहेत. हा सामना केकेआरच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात ईडन गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. पंजाब किंग्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार श्रेयस अय्यर याने अजिंक्य रहाणे याच्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केकेआरचे गोलंदाज पंजाबला आपल्या घरच्या मैदानात किती धावांवर रोखणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने

पंजाब आणि कोलकाता या दोन्ही संघांची IPL 2025 मध्ये आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी 15 एप्रिलला दोन्ही संघामध्ये लढत झाली होती. तेव्हा पंजाबने इतिहास घडवला होता. पंजाबने केकेआर विरुद्ध आयपीएल इतिहासातील निच्चांकी धावसंख्येचा बचाव केला होता. पंजाबने 112 धावांचा पाठलाग करायला आलेल्या केकेआरला 95 रन्सवर गुंडाळलं होतं. त्यामुळे आता केकेआरचा पंजाबचा धुव्वा उडवत मागील अपमानजनक पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न असणार आहे.

नंबर 5 आणि 7

पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांचा हा या मोसमातील नववा सामना आहे. त्याआधीच्या 8 पैकी 5 सामन्यांमध्ये पंजाबने विजय मिळवला आहे. तर कोलकाताला फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. पंजाब 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर कोलकाता 6 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. पंजाबचा नेट रनरेट हा +0.177 असा आहे. तर केकेआरचा नेट रनरेट पंजाबपेक्षा चांगला आहे. केकेआरचा नेट रनरेट हा +0.212 असा आहे.

केकेआरसमोर विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रोवमन पॉवेल, वैभव अरोरा, चेतन साकारिया, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), नेहल वढेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.