AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs DC : दिल्लीचं कडक कमबॅक, लखनौला पद्धतशीर रोखलं, विजयासाठी 160 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

Lucknow Super Giants vs Delhi Capitals 1st Innings Highlights : दिल्ली कॅपिट्ल्सला आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सहाव्या विजायासाठी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रती ओव्हर 8 च्या रनरेटने धावा करायच्या आहेत.

LSG vs DC : दिल्लीचं कडक कमबॅक, लखनौला पद्धतशीर रोखलं, विजयासाठी 160 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Delhi Capitals Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 22, 2025 | 9:43 PM
Share

दिल्ली कॅपिट्ल्सने लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानात मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं आहे. लखनौला अप्रतिम सुरुवात मिळाल्यानंतरही 160 धावांचा आकडाही गाठता आला नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी कमबॅक केलं. त्यामुळे लखनौला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 159 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे आता लखनौला दिल्लीविरुद्धच्या गेल्या पराभवाची परतफेड करायची असेल तर गोलंदाजांनाच चमत्कार करावा लागणार आहे. तर दुसर्‍या बाजूला दिल्ली सहाव्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे या सामन्यात कोण विजयी ठरणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. दिल्लीने 24 मार्चला लखनौवर 1 विकेटने रंगतदार सामन्यात विजय मिळवला होता.

लखनौची बॅटिंग

दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने टॉस जिंकून लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. लखनौच्या सलामी जोडीने या संधीचा पुरेपुर फायदा घेतला आणि टीमला अप्रतिम सुरुवात करुन दिली. एडन मारक्रम आणि मिचेल मार्श या जोडीने 87 धावांची सलामी भागदारी केली. त्यानंतर लखनौला 10 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर 87 धावांवर पहिला झटका लागला. एडन मारक्रम आऊट झाला. मारक्रम याने 33 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्ससह सर्वाधिक 52 रन्स केल्या.

लखनौची त्यानंतर घसरगुंडी सुरु झाली. एडमनंतर 12 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर दिल्लीने लखनौला दुसरा आणि मोठा झटका दिला. मिचेल स्टार्क याने निकोलस पूरन याला 9 रन्सवर क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर बरोबर 2 ओव्हरनंतर लखनौने तिसरी विकेट गमावली. मुकेश कुमारने अब्दुल समद याला 2 धावांवर आऊट केलं. मुकेशने याच 14 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर सेट असलेल्या मिचेल मार्श याचाही काटा काढला आणि लखनौला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. मार्श याने 36 बॉलमध्ये 45 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे दिल्लीची 87 आऊट 1 वरुन 14 ओव्हरनंतर 4 आऊट 110 अशी स्थिती झाली. दिल्लीने पहिल्या 10 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 87 धावा केल्या. मात्र दिल्लीला त्यानंतर पुढील 5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून फक्त 31 धावाच करता आल्या.

लखनौ 159 धावांचा बचाव करणार का?

शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 41 धावा

दरम्यान त्यानंतर इमपॅक्ट प्लेअर आयुष बदोनी आणि डेव्हिड मिलर या दोघांनी केलेल्या खेळीमुळे दिल्लीने शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 41 रन्स केल्या. बदोनीने 21 बॉलमध्ये 6 फोर ठोकून 36 रन्स केल्या. तर डेव्हिड मिलर याने नाबाद 14 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार ऋषभ पंत लखनौच्या डावातील शेवटच्या बॉलवर झिरोवर बोल्ड झाला. दिल्लीसाठी मुकेश कुमार याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि दुष्मंथा चमीरा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.