AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs LSG : लखनौ सुपर जायंट्सचा हिशोब करण्यासाठी पलटण सज्ज, मुंबई इंडियन्स विजयी ‘पंच’ लगावणार?

Mumbai Indians vs Lucknow Super Giants Ipl 2025 : आयपीएल 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. जाणून घ्या.

MI vs LSG : लखनौ सुपर जायंट्सचा हिशोब करण्यासाठी पलटण सज्ज, मुंबई इंडियन्स विजयी 'पंच' लगावणार?
LSG vs MI Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 26, 2025 | 10:30 PM
Share

आयपीएल 2025 मध्ये रविवारी 27 एप्रिलला डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्याच सामन्याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसमने असणार आहेत. ऋषभ पंत हा लखनौचं तर हार्दिक पंड्या पलटणचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील दहावा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची ही एकमेकांसमोर येण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे.याआधी झालेल्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सने मुंबईवर मात केली होती. त्यामुळे पलटण लखनौचा हिशोब करण्यासाठी सज्ज आहे.

लखनौचा 12 धावांनी विजय, पलटणकडे परतफेडीची संधी

लखनौ आणि मुंबई या मोसमात 4 एप्रिलला आमनेसामने आले होते. या हायस्कोअरिंग आणि रंगतदार सामन्यात मुंबईला अवघ्या 12 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. मुंबईने 204 धावांच्या प्रत्युत्तरात 191 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे मुंबई एकाना स्टेडियममध्ये 12 धावांनी अपयशी ठरली होती. त्यामुळे पलटण आता आपल्या घरच्या मैदानात लखनौचा हिशोब बरोबर करण्याच्या तयारीने उतरणार आहे.

लखनौसमोर पलटणला रोखण्याचं आव्हान

दरम्यान लखनौसमोर मुंबईची विजयी घोडदौड रोखण्याचं आव्हान असणार आहे. मुबईची या हंगामात अडखळत सुरुवात झाली होती. मंबईला सलग 2 पराभवानंतर तिसऱ्या सामन्यात पहिलं यश मिळालं होतं. त्यानंतर मुंबईला पुन्हा 2 सामने गमवावे लागले. मात्र त्यानंतर पलटणने मुसंडी मारली. मुंबईने सलग 4 सामने जिंकले आणि दणक्यात कमॅबक केलं. मुंबईने दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि पुन्हा हैदराबादला लोळवलं. त्यामुळे लखनौसमोर मुंबईचा सुस्साट सुटलेला विजय रथ रोखण्याचं आव्हान असणार आहे.

मुंबईचा सामन्याआधी जोरदार सराव

लखनौ मुंबईवर वरचढ

दरम्यान हेड टु हेड आकडे पाहता लखनौ सुपर जायंट्स 5 वेळा चॅम्पियन्स असलेल्या मुंबईवर वरचढ राहिली आहे. लखनौ विरुद्ध मुंबई यांच्यात 7 सामने खेळवण्यात आले आहेत. लखनौने या 7 पैकी तब्बल 6 सामन्यांमध्ये मुंबईवर मात केली आहे. तर मुंबईला फक्त एकच सामना जिंकण्यात यश आलं आहे. त्यामुळे मुंबई लखनौवर मात करत सलग पाचवा विजय मिळवणार का? याकडे पलटणच्या चाहत्यांचं बारीक लक्ष लागून राहिलं आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.