MI vs CSK : शिवम दुबे-रवींद्र जडेजाची तोडफोड फिफ्टी, मुंबईसमोर 177 धावांचं आव्हान, पलटण जिंकणार?
Mumbai Indians vs Chennai Super Kings 1st Innings Highlights : चेन्नई सुपर किंग्सने वानखेडे स्टेडियममध्ये होम टीम मुंबई इंडियन्ससमोर 177 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सीएसकेसाठी रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे या जोडीने निर्णायक भूमिका बजावली.

रवींद्र जडेजा आणि लोकल बॉय शिवम दुबे या जोडीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 177 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने वानखेडे स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. चेन्नईसाठी रवींद्र जडेजा याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. शिवम दुबेने अर्धशतकी खेळी केली. डेब्यूटंट आयुष म्हात्रे याने 32 रन्स करुन आपली छाप सोडली. तर शेख रशीदने 19 धावा जोडल्या. आता मुंबई हे आव्हान पूर्ण करत 23 मार्च रोजी झालेल्या पराभवाची परतफेड करणार का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ओपनर रचीन रवींद्र 5 धावांवर आऊट झआला. त्यानंतर युवा डेब्यूटंट आयुष म्हात्रे याने तडाखेदार बॅटिंग करुन चेन्नईला शानदार सुरुवात दिली. मात्र आयुषसोबत असलेल्या शेख राशिदला मुंबईच्या बॉलिंगचा खास सामना करता आला नाही. दुसऱ्या बाजूला आयुष फटकेबाजी करत होता. मात्र या फटकेबाजीत आयुष आऊट झाला. आयुषने 15 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरसह 32 रन्स केल्या. आयुषनंतर शेख रशीदही आऊट झाला. त्यामुळे चेन्नईची 8 ओव्हरनंतर 3 आऊट 63 अशी स्थिती झाली. त्यामुळे चेन्नई बॅकफुटवर गेली. मात्र त्यानंतर रवींद्र जडेजा आणि शिवम दुबेने डाव सावरला.
दुबे-जडेजाची निर्णायक भागीदारी
दुबे-जडेजा जोडीने भागीदारी करत चेन्नईचा डाव सावरला. दोघांनी मैदानात घट्ट पाय रोवले. दोघांनीही सेट झाल्यानंतर टॉप गियर टाकला आणि फटकेबाजी करायला सुरुवात केली. जडेजाच्या तुलनेत शिवम जोरदार फटकेबाजी करत होता. दुबेने 30 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. दुबेच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 10 वं अर्धशतक ठरलं. मात्र दुबे त्यानंतर आऊट झाला आणि जोडी फुटली. दुबे-जडेजा या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 52 बॉलमध्ये 79 रन्सची पार्टनरशीप केली. तर दुबेने 32 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.
दुबे-जडेजा फिफ्टी फिफ्टी
Innings Break!
Fifties from lefties Ravindra Jadeja and Shivam Dube power #CSK to 176/5 👏
Will #MI complete back-to-back wins at home? 🤔
Scorecard ▶ https://t.co/v2k7Y5tg2Q#TATAIPL | #MIvCSK pic.twitter.com/63OkmdxMwW
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025
दुबे आऊट झाल्यानतंर जडेजाने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि त्यानेही अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी 4 धावांवर आऊट झाला. तर जडेजा आणि जेमी ओव्हरटन हे दोघे नाबाद परतले. जडेजाने 35 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीने नॉट आऊट 53 रन्स केल्या. तर जेमी ओव्हरटन 4 धावांवर नाबाद परतला. मुंबईकडून जसप्रीत बुमराह याने 2 विकेट्स घेतल्या. तर दीपक चाहर, अश्वनी कुमार आणि मिचेल सँटनर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
