IPL 2025 MI vs DC Live Streaming : दिल्लीसमोर मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जाण्यापासून रोखण्याचं आव्हान, कोण मिळवणार विजय?
Mumbai Indians vs Delhi Capitals Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स दोन्ही संघ बुधवारी आयपीएलच्या 18 व्या मोसमातील आपला 13 वा सामना खेळणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 63 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा प्लेऑफच्या दृष्टीने निर्णायक सामना आहे. प्लेऑफसाठी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स हे 3 संघ प्लेऑफमध्ये पोहचले आहेत. त्यामुळे आता उर्वरित एका जागेसाठी दिल्ली आणि मुंबई या 2 सघांमध्ये जोरदार चुरस आहे. अशात हा सामना कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे. अक्षर पटेल याच्याकडे दिल्लीच्या संघाची जबाबदारी आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येईल? हे सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना कधी?
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना बुधवारी 21 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना कुठे?
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅचचा थरार अनुभवता येईल.
मुंबई-दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये कुठे?
मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांनी या मोसमात आतापर्यंत प्रत्येकी एकूण 12 सामने खेळले आहेत. मुंबईने 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर पलटणला 5 वेळा पराभूत व्हावं लागलं. दिल्लीने 12 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीला मुंबईप्रमाणे 5 वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. तर दिल्लीचा एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दिल्लीच्या 13 तर मुंबईच्या खात्यात 14 पॉइंट्स आहेत.
दिल्ली हिशोब बरोबर करणार?
दरम्यान दिल्ली आणि मुंबई या दोन्ही संघांची 18 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. याआधी 13 एप्रिलला मुंबईने दिल्लीवर 12 धावांनी मात केली होती. त्यामुळे दिल्ली मुंबईवर मात करुन गेल्या पराभवाची परतफेड करण्यासह प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यात यशस्वी होणार का? याकडे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष असणार आहे.