IPL 2025 MI vs GT Live Streaming : मुंबई विरुद्ध गुजरात आमनेसामने, मंगळवारी कोण जिंकणार?
Mumbai Indians vs Gujarat Titans Live Streaming : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स मंगळवारी 6 मे ला आमनेसामने असणार आहेत. हा सामना कधी आणि कुठे पाहायला मिळेल? जाणून घ्या.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील साखळी फेरीतील शेवटचे काही सामने खेळवण्यात येत आहेत. या हंगामातील 54 व्या सामन्यानंतरही प्लेऑफसाठी एकही संघ निश्चित झालेला नाही. मात्र चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. त्यामुळे प्लेऑफच्या 4 जागांसाठी 8 संघामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. मंगळवारी 6 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात चढाओढ असणार आहे. दोन्ही संघ प्लेऑफसाठी प्रबळ दावेदार आहेत. तसेच पॉइंट्स टेबल आणि एका सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही संघांची स्थिती सारखीच आहे. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चढाओढ पाहायला मिळणार आहे.
मुंबई इंडियन्सचा हा या मोसमातील 12वा तर गुजरातचा 11 वा सामना असणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सच्या नेतृत्वाची धुरा आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना केव्हा?
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना मंगळवारी 6 मे रोजी होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कुठे?
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दोघांपैकी वरचढ कोण?
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 6 वेळा आमनेसामने आले आहेत. गुजरातने या 6 पैकी 4 सामन्यांमध्ये मुंबईचा धुव्वा उडवला आहे. तर मुंबईला फक्त 2 वेळाच विजयी होता आलं आहे.
