AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोलकात्यासाठी आनंदाची बातमी, पिच वादावर चंद्रकांत पंडित म्हणाले..

आयपीएल स्पर्धेतील 12 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. त्याला कारणही तसंच आहे. चला जाणून घेऊयात

IPL 2025 : मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोलकात्यासाठी आनंदाची बातमी, पिच वादावर चंद्रकांत पंडित म्हणाले..
Image Credit source: KKR Twitter
| Updated on: Mar 30, 2025 | 10:33 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील 12 वा सामना 31 मार्चला कोलकता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात अष्टपैलू सुनील नरीन खेळला नव्हता. पण या सामन्यापूर्वी सुनील नरीन फिट झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी सामन्याच्या एक दिवस आधी ही माहिती दिली आहे. इतकंच काय तर खेळपट्टीच्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही कोणत्याही खेळपट्टीवर खेळण्यास तयार असल्याचं सांगितलं. द इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार चंद्रकांत पंडित यांनी सुनील नरीन बाबत सांगितलं की, ‘सुनील फिट आहे. तो पूर्णपणे तंदुरूस्त आहे. शनिवारपासूनच तो सराव करत आहे. त्यामुळे तो ठीक आहे.’

कोलकाता नाईट रायडर्स संघ आणि पिच वादाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे बोलला होता की, ईडन गार्डनमध्ये मनासारखी परिस्थिती नव्हती. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळण्याचा तसा काही फायदा मिळाला नाही. चंद्रकांत पंडित यांना याबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्यांनी या विषयाला बगल देत म्हणाले की, जी खेळपट्टी दिली जाईत, त्यावरच खेळावं लागेल.

चंद्रकांत पंडित यांनी सांगितलं की, ‘एक प्रशिक्षक म्हणून आणि एक टीम म्हणून आम्हाला जी खेळपट्टी दिली जाते त्यावर खेळतो. यावर पूर्णपणे क्यूरेटरचं नियंत्रण असतं. पण आता आमचं लक्ष सोमवारी होणाऱ्या सामन्याकडे आहे. त्यामुळे आम्ही सध्या तरी त्याबाबत विचार करत नाही. सोमवारचा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.’

कोलकाता नाईट रायडर्स संघ: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, आंगकृष्ण रघुवंशी, मनीष नॉरजे, एन रॉबनी, लूक, एन रॉबनी, लूक, एन. सुनील नरेन, रोवमन पॉवेल, मयंक मार्कंडे, रहमानउल्ला गुरबाज, चेतन साकारिया.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.