AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 MI vs PBKS : क्वॉलिफायर 2 सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत कोण? आरसीबीसोबत हा संघ भिडणार

आयपीएल 2025 क्वॉलिफायर 2 फेरीत मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत धडक मारणार आहे.

IPL 2025 MI vs PBKS : क्वॉलिफायर 2 सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत कोण? आरसीबीसोबत हा संघ भिडणार
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्सImage Credit source: PTI
| Updated on: May 31, 2025 | 7:26 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीत मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होणार आहे. 1 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्वॉलिफायर 2 फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु लढणार आहे. त्यामुळे हा सामना महत्त्वाचा आहे. दोन्ही संघासाठी करो या मरोची लढाई आहे. असं असताना हा सामना पाऊस किंवा इतर काही कारणामुळे रद्द झाला तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कोणत्याही परिस्थितीत या सामन्याचा निकाल देण्यासाठी प्रत्येकी पाच षटकांचा खेळ होणं आवश्यक आहे. या सामन्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला नाही. जर हा सामना काही कारणास्तव 1 जून रोजी पूर्ण होऊ शकला नाही तर मात्र एका संघाला पुढचं तिकीट मिळेल. पण कसं ठरवणार ते जाणून घ्या.

मुंबई इंडियन्ससाठी धाकधूक

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर मुंबईचं टेन्शन वाढेल. कारण गुणतालिकेत मुंबई इंडियन्सची स्थिती नाजूक आहे. मुंबई इंडियन्स 16 गुणांसह चौथ्या स्थानावर होती. प्लेऑफमध्ये तर क्वॉलिफाय झाली. पण जर तरच्या गणितात टेन्शन आहे. कारण सध्या देशात मान्सूनने धडक दिली आहे. कधीही पाऊस पडेल सांगता येत नाही. अशा स्थितीत मुंबई इंडियन्सचे चाहते पाऊस पडू नये यासाठी प्रार्थना करत आहेत. कारण या स्पर्धेतील काही सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सला या पावसाचा फटका बसला आहे.

1 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम आणि आसापास पावसाची शक्यता नाही. पण पावसामुळे सामना रद्द झाला तर पंजाब किंग्सला फायदा होईल. कारण गुणतालिकेत पंजाब किंग्स संघ टॉपला आहे. तर मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे गुणतालिकेत टॉपला असलेल्या संघाला पुढच्या फेरीचं तिकीट मिळणार आहे. दुसरीकडे, अंतिम फेरीसाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. जर हा सामना ठरलेल्या दिवशी झाला नाही तर जिथे थांबला तेथून पुढे सुरुवात होणार आहे. हा सामना 3 जूनला नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच होणार आहे.

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल