जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर विराट कोहलीचा कडक सिक्स, नोंदवला असा विक्रम Video
आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघही मुंबई इंडियन्सवर भारी पडल्याचं दिसत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आरसीबीला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान होतं. पण विराट कोहलीने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची हवा काढली. तसेच कमबॅक करणाऱ्या जसप्रीत बुमराहला कडक षटकार मारला.

आयपीएल 2025 स्पर्धेतील मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. विराट कोहलीने या सामन्यात एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आतापर्यंत अशी कामगिरी कोणताही भारतीय फलंदाजी करू शकलेलं नाही. विराट कोहलीने या सामन्यात आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवलं. या सामन्यात 17 धावांचा पल्ला ओलांडताच नव्या विक्रमला गवसणी घातली आहे. टी20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने टी20 करिअरची सुरुवात 2007 मध्ये केली होती. आतापर्यंत विराट कोहली त्याच्या क्रिकेट कारकिर्दित 402 सामने खेळला आहे. यात त्याने 13 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. यात 9 शतकं आणि 99 अर्धशतकांचा समावेश झाला आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आतापर्यंत त्याने 256 सामन्यात 8100 हून अधिक धावा केल्या आहेत. यात 8 शतकं आणि 57 अर्धशतकांचा समावेश आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने 125 सामन्यात 137.04 च्या स्ट्राईक रेटने 4188 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे.
दरम्यान, या सामन्यात विराट कोहली विरुद्ध जसप्रीत बुमराह हे द्वंद्वही पाहायला मिळालं. दुखापतीतून सावरल्यानंतर कमबॅकच्या सामन्यात जसप्रीत बुमराह काही खास करू शकला नाही. पहिल्याच षटकात विराट कोहलीने त्याला उत्तुंग षटकार मारला. देवदत्त पडिक्कलने पहिल्या चेंडूवर एक धाव घेत विराट स्ट्राईक दिली. मग काय पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. या षटकाराचं कौतुक होत आहे. बुमराहने टाकलेला चेंडू टप्प्यात असल्याचं पाहून मिडविकेटवरून षटकार मारला. विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये 29 चेंडूत 99वं अर्धशतक ठोकलं.
WHAT A SIX BY VIRAT KOHLI AGAINST JASPRIT BUMRAH. 🤯🔥pic.twitter.com/KSpXjQsSqE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 7, 2025
विराट कोहलीला बाद करण्यात कर्णधार हार्दिक पांड्याला यश आलं. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात चेंडू वर चढला आणि नमन धीरने कोणतीही चूक न करता झेल पकडला. विराट कोहलीने 42 चेंडूत 67 धावांची खेळी केली.
