AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : मुंबई इंडियन्सला टॉप 2 मध्ये येण्याची मोठी संधी, फक्त असं झालं की…

आयपीएल 2025 स्पर्धेतील 66वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. प्लेऑफचे चार संघ ठरले आहेत. मात्र टॉप 2 संघांची शर्यत सुरु आहे. त्यामुळे या सामन्यातीन निकाल खूपच महत्त्वाचा आहे. तसेच मुंबई इंडियन्सला टॉप 2 मध्ये येण्याची संधी आहे. कसं ते समजून घ्या.

IPL 2025 : मुंबई इंडियन्सला टॉप 2 मध्ये येण्याची मोठी संधी, फक्त असं झालं की...
मुंबई इंडियन्सImage Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 24, 2025 | 6:00 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील 66व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येतील. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर होणारा हा सामना पंजाब किंग्जने जिंकला तर ते पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचतील.पंजाब किंग्स जिंकला तर गुजरात टायटन्स, आरसीबी आणि मुंबई इंडियन्सला अडचणी येतील. कारण जर पंजाबने दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्धचे सामने जिंकले तर ते एकूण 21 गुणांसह पहिल्या क्वालिफायरसाठी पात्र ठरतील. पण हा सामना गमावला तर गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स आणि आरसीबीला टॉप 2 मध्ये येण्याची संधी मिळू शकते. आता फक्त मुंबई इंडियन्सचं गणित समजून घेऊयात. टॉप 3 मध्ये असलेल्या संघांनी मोक्याच्या क्षणी पराभवाचं तोंड पाहिलं तर मुंबई इंडियन्सला संधी मिळू शकते.

मुंबई इंडियन्सचं टॉप 2 चं समीकरण

गुजरात टायनटन्सने आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले असून 9 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. गुजरात टायटन्स 18 गुणांसह टॉपला आहे. या स्पर्धेतील शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. हा सामना जिंकला तर 20 गुण होतील. तसेच टॉप 2 मधील स्थान पक्कं होईल. पण हा सामना गमावला तर मुंबई इंडियन्सला संधी मिळू शकते. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तर 18 गुण होतील. गुजरातच्या तुलनेत मुंबईचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे गुणतालिकेत गुजरातच्या वर असेल.

पंजाब किंग्स साखळी फेरीत आतापर्यत 12 सामने खेळली असून 8 सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. एक सामना पावासामुळे रद्द झाला. त्यामुळे प्रत्येकी एक गुण मिळाला. पंजाब किंग्स 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता साखळी फेरीत दोन सामने शिल्लक आहे. जर दिल्ली विरुद्धचा सामना जिंकला तर मुंबईची संधी जाईल. कारण 19 गुण मुंबईकडून होणारच नाहीत. पण दिल्लीविरुद्धचा सामना गमावला आणि मुंबईने शेवटच्या सामन्यात पराभूत केलं तर 18 गुणांसह टॉप 2 मध्ये जागा मिळवू शकते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं टॉप 2 चं गणित किचकट झालं आहे. कारण 13 सामन्यापैकी 8 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव झाला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे 17 गुण आहेत. शेवटचा सामना जिंकला तर 19 गुण होतील. पण हा सामना गमावला आणि मुंबईने शेवटचा सामना जिंकला तर टॉप 2 मध्ये जाईल.

टॉप 2 मध्ये राहण्यासाठी इतकी धडपड का?

प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या चार संघांची टॉप 2 मध्ये राहण्याची धडपड का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर टॉप 2 संघांना अंतिम फेरीसाठी दोन संधी मिळतात. क्वॉलिफाय 1 मध्ये दोन्ही टॉपचे संघ भिडतात. विजयी संघ थेट अंतिम फेरी गाठतो. तर पराभूत संघ क्वॉलिफाय 2 फेरीत जातो. तिसऱ्या आणि चौथ्या संघातील विजयी संघाशी येथे लढत होते. त्यानंतर पुन्हा अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळते. त्यामुळे टॉप 2 चं गणित फ्रेंचायझींसाठी खूपच महत्त्वाचं आहे.

बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?.