RR vs MI Toss : राजस्थानने मुंबई इंडियन्स विरुद्ध टॉस जिंकला, प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल, मॅचविनर बॉलर आऊट
Rajasthan Royals vs Mumbai Indians Toss And Playing 11 : जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये यजमान राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 11 वा सामना आहे

आयपीएल 2025 मधील 50 व्या सामन्याचं आयोजन हे जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्यात होम टीम राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. हा दोन्ही संघांचा या मोसमातील 11 वा सामना आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 3 मिनिटांनी टॉस झाला. राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार रियान पराग याने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. मुंबईने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मुंबई त्याच प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरणार आहे. तर राजस्थानने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत.
राजस्थानला मोठा झटका
राजस्थानला नाईलाजाने या सामन्यात बदल करावा लागला आहे. राजस्थानला मॅचविनर गोलंदाज बाहेर झाल्याने मोठा झटका लागला आहे. वेगवान गोलंदाज संदीप शर्मा बोटाच्या दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाला आहे. संदीपच्या जागी आकाश मढवाल याला संधी देण्यात आली आहे. तर वानिंदू हसरंगा याच्या जागी कुमार कार्तिकेय याचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार रियान पराग याने टॉस दरम्यान ही माहिती दिली.
दोघांपैकी वरचढ कोण?
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघाची आयपीएलमध्ये आमनेसामने येण्याची 31 वी वेळ आहे. याआधी उभयसंघात 30 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने या 30 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर राजस्थानने मुंबईवर 14 सामन्यांमध्ये मात केली आहे. त्यामुळे आकडेवारी पाहता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. तसेच या संघांमधील एक सामन्याचा निकाल लागला नाही.
राजस्थानसमोर मुंबईचा झंझावात रोखण्याचं आव्हान
मुंबईने या मोसमात आतापर्यंत सलग 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबई सलग सहाव्या विजयासाठी सज्ज आहे. तर राजस्थानसाठी हा करो या मरो असा सामना आहे.त्यामुळे राजस्थानसमोर विजय मिळवण्यासह पलटणला रोखण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे.
राजस्थानने टॉस जिंकला
🚨 Toss 🚨@rajasthanroyals won the toss and opted to bowl first against @mipaltan
Updates ▶️ https://t.co/t4j49gXHDu#TATAIPL | #RRvMI pic.twitter.com/H3Z2V7mkDx
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2025
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल आणि फजलहक फारुकी.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.
