AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : इशान किशनचा 18 व्या मोसमाआधी झंझावात, प्रतिस्पर्धी संघांना टेन्शन

Ishan Kishan Srh IPL 2025 : युवा आणि स्फोटक विकेटकीपर फलंदाज ईशान किशन याने आयपीएल 18 व्या मोसमाआधी 42 बॉलमध्ये 113 रन्स करुन धमाका केला आहे.

IPL 2025 : इशान किशनचा 18 व्या मोसमाआधी झंझावात, प्रतिस्पर्धी संघांना टेन्शन
Ishan Kishan IplImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 18, 2025 | 10:17 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. एकूण 10 संघ, सपोर्ट स्टाफ आणि असंख्य क्रिकेट चाहते या हंगामासाठी उत्सूक आणि सज्ज आहेत. सनरायजर्स हैदराबाद टीमने टीम इंडियाचा विस्फोटक विकेटकीपर फलंदाज ईशान किशन याला 11 कोटी 25 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. इशान किशन याने 18 व्या मोसमाआधी स्फोटक खेळी करुन टीम मॅनेजमेंटचा निर्णय योग्य ठरवलाय, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. ईशानने या हंगामाआधीच बॅटिंगने हंगामा केला आहे. हैदराबाद टीम राजीव गांधी स्टेडियममध्ये सराव करत आहे. याच स्टेडियममध्ये सरावाच्या दृष्टीने हैदराबाद संघातील खेळाडूंमध्ये आपआपसात सामने खेळवण्यात येत आहेत. ईशानने या 2 सराव सामन्यात धमाका केला.

ईशानने दोन्ही सामन्यांत एकूण 42 बॉलमध्ये 113 धावा केल्या. ईशानने पहिल्या सामन्यात 23 चेंडूत 64 धावा केल्या. तसेच आज (मंगळवारी 18 मार्च) 19 बॉलमध्ये 49 रन्स केल्या. ईशानने या खेळीसह आपण 18 व्या मोसमासाठी सज्ज असल्याचं एकाप्रकारे जाहीर केलं आहे. हैदराबाद टीममध्ये अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड आणि हेन्रिक क्लासेन यासारखे विस्फोटक फलंदाज आहेत. त्यात आता ईशान किशनही आहे. त्यामुळे हैदराबाद टीम 300 पार मजल मारु शकते.

हैदराबादच्या फलंदाजांनी 17 व्या मोसमात धुमधडाका केला होता. हैदराबादने गत मोसमात 20 षटकांमध्ये 287 धावा केल्या. हैदराबादने बंगळुरुविरुद्धच्या या सामन्यात एकूण 22 षटकार लगावले होते. तेव्हा हेडने 41 चेंडूत 102 धावांची शतकी खेळी केली. तसेच हेन्रिक क्लासेन याने 31 बॉलमध्ये 67 रन्स केल्या होत्या. तसेच अब्दुल समद याने 10 चेंडूत 37 धावांची भर घातली होती. आता या हंगामापासून ईशान किशन हैदराबादसाठी खेळणार आहे. त्यामुळे हैदराबादच्या बॅटिंगला आणखी बूस्टर मिळाला आहे. त्यामुळे हैदराबाद आयपीएलमध्ये एका डावात किती धावा करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

षटकारांचा पाऊस

हैदराबादच्या फक्त 2 फलंदाजांनीच गेल्या हंगामात एकूण 74 षटकार लगावले होते. भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने 42 सिक्स खेचले होते. तर ट्रेव्हिस हेड याने 32 षटकार फटकावले होते. त्यामुळे इतर 9 संघांसमोर या दोघांनाही रोखण्याचं आव्हान असणार आहे.

आयपीएल  18 व्या मोसमासाठी सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), हेनरिक क्लासन, ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नीतीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ईशान किशन, राहुल चाहर, एडम झॅम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंह, जीशान अन्सारी, जयदेव उनादकट, ब्रायडन कार्स, अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, कामिंदु मेंडिस आणि सचिन बेबी.

Follow Us
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
CM Devendra Fadnavis On Farmers : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स.....
Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स, 13 वर्षांचा प्रवास संपला
गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर...
Gokul Milk Union : गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर; राज्यपालांच्या निर्णयाने सत्तेचं गणित बदलणार?
ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद
Thane ATS : ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई
मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
Murasu Cyclone Andhra Pradesh : मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
Saamana On BJP : हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरण....
NCP  : 10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठा निर्णय होणार?
गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा...
Satej Patil On Gokul : गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा सरकारला थेट इशारा