SRH vs MI : मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध टॉस जिंकला, कॅप्टन हार्दिकचा रोहितबाबत मोठा निर्णय
IPL 2025 SRH vs MI Toss And Playing Eleven : मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध त्यांचा होम ग्राउंड अर्थात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये टॉस जिंकला आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने या सामन्यासाठी रोहित शर्माबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 41 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांची ही या हंगामात आणि साखळी फरीत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. उभयसंघात 17 एप्रिलला झालेल्या सामन्यात होम टीम मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर वानखेडे स्टेडियममध्ये 4 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अंत्यत साधेपणाने नाणफेक करण्यात आली. मुंबईने टॉस जिंकला. कर्णधार हार्दिक पंड्या याने हैदराबाद विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
हार्दिकचा रोहितबाबत मोठा निर्णय
कर्णधार हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेण्यासह रोहित शर्मा याच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई चेसिंग करणार असल्याने रोहितचा पुन्हा एकदा सबस्टीट्यूट खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रोहित इमपॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार असल्याने त्याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश नाही.
मुंबई हैदराबादवर वरचढ
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांची आयपीएल इतिहासात आमनेसामने येण्याची ही 25 वी वेळ आहे. त्याआधी उभयसंघात 24 सामने झाले आहेत. मुंबई हैदराबादवर वरचढ राहिली आहे. मुंबईने हैदराबादला 14 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे. तर हैदराबादने मुंबईवर 10 वेळा मात केली आहे.
मुंबईकडे सलग चौथ्या विजयाची संधी
दरम्यान मुंबई इंडियन्सकडे सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत या मोसमातील सलग चौथा आणि एकूण पाचवा विजय मिळवण्याची संधी आहे. मुंबईचा सनरायजर्स हैदराबादविरुद्धचा हा या मोसमातील नववा सामना आहे. मुंबईने याआधी खेळलेल्या 8 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
सामन्याआधी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली
Let’s all stand for peace and humanity.
A minute’s silence was observed in Hyderabad to pay respect to the victims of Pahalgam terror attack.
All the players, support staff, commentators & match officials are wearing black armbands for tonight’s game. #TATAIPL | #SRHvMI pic.twitter.com/PIVOrIyexY
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2025
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि विघ्नेश पुथूर.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, जीशान अन्सारी आणि एशान मलिंगा.
