AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 Orange Cap : विराट कोहलीचा खेळ 12 धावांवर आटोपला, तरी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत…

आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जबरदस्त कामगिरी केली. या सामन्यात विराट कोहलीचा खेळ 12 धावांवर आटोपला. पण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पोहोचला आहे. कोणत्या स्थानावर आहे ते वाचा

IPL 2025 Orange Cap : विराट कोहलीचा खेळ 12 धावांवर आटोपला, तरी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत...
विराट कोहलीImage Credit source: PTI
| Updated on: May 29, 2025 | 11:16 PM
Share

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा आठ विकेट्सने धुव्वा उडवला. या विजयासह 2025 आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. आता अंतिम फेरीचा सामना 3 जून होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2009, 2011 आणि 2016 नंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नऊ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अंतिम फेरी गाठली आहे. पंजाब किंग्सने विजयासाठी 101 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. विजयासाठी दिलेल्या 101 धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने 12 धावा केल्या. विराट कोहलीचा आयपीएल प्लेऑफमधील रेकॉर्ड खूपच खराब आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. काइल जेमिसनच्या गोलंदाजीवर विकेट देऊन बसला. असं असलं तरी विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे.

विराट कोहलीने पंजाबी किंग्सविरुद्ध 12 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 12 धावा केल्या. आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली टॉप 5 मध्ये पोहोचला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 14 सामन्यातील 14 डावात 613 धावा केल्या आहेत. या सामन्यात आणखी काही धावा केल्या असत्या तर ऑरेंज कॅपची शर्यत अंतिम फेरीपर्यंत सोपी झाली असती. पण आता एका सामन्यात मोठं अंतर कापण्याचं आव्हान असणार आहे. सध्या ऑरेंज कॅप साई सुदर्शनकडे असून त्याने 14 सामन्यात 679 धावा केल्या आहेत. त्यात साई सुदर्शन मुंबई इंडियन्सविरुद्ध किती धावा करतो याकडेही लक्ष असेल. त्याने यात आणखी भर घातली तर विराट कोहली अव्वल स्थान गाठणं कठीण जाईल.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली मानाचं स्थान मिळवलं आहे. त्याने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहली सर्वाधिक चौकारांच्या यादीत 266 चौकारांसह दुसऱ्या स्थानावर होता. पण विराट कोहली फक्त 12 धावा करू शकला. या खेळीत त्याने फक्त दोन चौकार मारले. शिखर धवनने 221 डावात 768 चौकार मारले आहेत. आता कोहलीनेही या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराट कोहलीने 266 सामन्यांच्या 258 डावात 768 चौकार मारले आहेत. विराट कोहलीने अंतिम सामन्यात एक चौकार मारला तर हा विक्रम त्याच्या नावावर होईल.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.