AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs RR : अजिंक्य पहिल्या विजयानंतर आनंदी, कॅप्टन तिघांचं नाव घेत म्हणाला…

Ajinkya Rahane Post Match KKR vs RR : अजिंक्य रहाणे केकेआर विरुद्ध फलंदाज म्हणून अपयशी ठरला. रहाणे सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट झाला. मात्र रहाणेने त्याच्या नेतृत्वात केकेआरला विजयी केलं. रहाणेने या विजयाचं श्रेय तिघांना देताना काय म्हटलं? जाणून घ्या.

KKR vs RR : अजिंक्य पहिल्या विजयानंतर आनंदी, कॅप्टन तिघांचं नाव घेत म्हणाला...
KKR Ajinkya Rahane IPLImage Credit source: IPL X Account
| Updated on: Apr 19, 2026 | 10:38 PM
Share

एकूण 3 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला 19 व्या मोसमात पहिल्या विजयासाठी तब्बल सातव्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागली. टीममध्ये एकसेएक फलंदाज आणि गोलंदाज असूनही केकेआरला पहिल्या 6 पैकी 5 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. तर 1 सामना पावसाने वाया घालवला. त्यामुळे केकेआर रविवारी 19 एप्रिलला डबल हेडरमधील पहिल्या आणि आपल्या मोहिमेतील सातव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध विजय मिळवत पराभवाची मालिका खंडीत करणार का? याची प्रतिक्षा होती. केकेआरने मोसमातील पहिला विजय घरच्या मैदानात मिळवला. मात्र या विजयासाठीही केकेआरला शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला. केकेआरच्या या पहिल्या विजयानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. अजिंक्यने या विजयानंतर केकेआरच्या तिघांना श्रेय दिलं.

केकेआरने राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 155 रन्सवर रोखलं. केकेआरसाठी वरुण चक्रवर्ती आणि कार्तिक त्यागी या दोघांनी राजस्थानच्या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर केकेआरची 156 रन्सचा पाठलाग करताना 14 ओव्हरमध्ये 6 आऊट 85 अशी नाजूक स्थिती झाली होती. मात्र इथून उपकर्णधार रिंकु सिंह आणि अनूकुल रॉय या जोडीने गेम फिरवला. दोघांनी उर्वरित धावा करत केकेआरला विजयी केलं. रिंकूने नाबाद 53 तर अनुकूल 29 धावांची खेळी करत केकेआरला पहिला विजय मिळवून दिला. केकेआरच्या या विजयानंतर कॅप्टन रहाणे याने काय म्हटलं हे जाणून घेऊयात.

कॅप्टन रहाणेची प्रतिक्रिया

“मी या विजयानंतर फार आनंदी आहे. मला सामन्यानंतर 5 मिनिटं अधिक वेळ मिळाला. फार चांगलं वाटतंय. सामन्यादरम्यान भावना उचंबळत होत्या. मी वैयक्तिरित्या रिंकु सिंह, अनुकूल रॉय आणि वरुण चक्रवर्ती या तिघांसाठी फार आनंदी आहे”, असं रहाणेने म्हटलं.

“वरुण फार वाईट काळातून जात होता. वरुण गेल्या 3 सामन्यांत चांगली बॉलिंग करत होता. रिंकु मानसिकरित्या कठीण काळातून जात होता. रिंकूला सामना संपवताना पाहून फार आनंद झाला”, असं अजिंक्यने म्हटलं. केकेआरला विजयासाठी 3 चेंडूत 1 धावेची गरज असताना रिंकु सिंह याने षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं आणि टीमला जिंकवलं.

स्कोअरकार्ड

अनूकुल रॉयसाठी रहाणेने काय म्हटलं?

अनुकूलने रिंकूसोबत सातव्या विकेटसाठी नॉट आऊट 76 रन्सची पार्टनरशीप करत केकेआरच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. अजिंक्यने अुनूकलच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीचा उल्लेख केला. ” त्याच्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमधील हंगाम फार चांगला राहिला. तो फार विश्वासू खेळाडू आहे. त्याला पाहून फार आनंद झाला”, असंही रहाणे म्हणाला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...