DC vs RCB Toss : आरसीबीचा फिल्डिंगचा निर्णय, नाशिककर साहिल पारखचं पदार्पण, ओपनिंग करणार
Delhi Capitals vs Royal Challengers Bengaluru Toss and Playing 11 : गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग ईलेव्हन.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 39 व्या सामन्यात आज 27 एप्रिलला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. आरसीबी आणि दिल्ली दोन्ही संघांचा हा या मोसमातील आठवा सामना आहे. तसेच दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. आरसीबीने गेल्या सामन्यात दिल्लीवर विजय मिळवला होता. त्यामुळे आज दिल्लीचा गेल्या पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न असणार आहे. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन रजत पाटीदार याने फिल्डिंगचा निर्णय घेत दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
प्लेइंग ईलेव्हनबाबत अपडेट
आरसीबीने दिल्ली विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दिल्लीने एकूण 3 बदल केले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्रचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नाशिककर साहिल पारख याचं आयपीएल पदार्पण झालं आहे. साहिल दिल्लीसाठी ओपनिंग करणार आहे. तर कायले जेमिसन याचं दिल्लीकडून पदार्पण झालंय. तसेच दुष्मंथा चमीरा याचं कमबॅक झालं आहे.
दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती
आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर गतविजेत्या संघाचा 2 सामन्यांत पराभव झाला आहे. बंगळुरु 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. दिल्लीला 7 पैकी 3 सामन्यांतच विजय मिळवता आला आहे. तर दिल्लीचा 4 सामन्यांत पराभव झालाय. दिल्लीच्या खात्यात 6 गुण आहेत.
आरसीबी दिल्लीवर वरचढ
दरम्यान दिल्ली विरुद्ध बंगळुरु यांच्यातील हा 35 वा सामना आहे. आरसीबीने याआधी दिल्ली विरुद्ध झालेल्या 34 पैकी सर्वाधिक सामन्यांत विजय मिळवला आहे. आरसीबीने दिल्लीवर 19 वेळा विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 13 सामन्यांत आरसीबीला पराभूत केलं आहे.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : साहिल पारख, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हीड मिलर, अक्षर पटेल (कॅप्टन), दुष्मंथा चमीरा, कायल जेमिसन, कुलदीप यादव आणि टी नटराजन.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हीड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवुड, सुयश शर्मा आणि रसिक सलाम दार.
