AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs CSK : मुंबईने लाज घालवली, पलटणचा सर्वात मोठा पराभव, चेन्नईकडून 103 धावांनी धुव्वा

Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Result, IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र यलो आर्मीने पलटणचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला.

MI vs CSK : मुंबईने लाज घालवली, पलटणचा सर्वात मोठा पराभव, चेन्नईकडून 103 धावांनी धुव्वा
CSK vs MI Match Result IPL 2026Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 24, 2026 | 5:00 AM
Share

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात इतिहास घडवला आहे. चेन्नईने होम टीम मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवला आहे. संजू सॅमसन याने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने मुंबईसमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईला या विजयी धावांचा पाठलाग करताना पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. इम्पॅक्ट प्लेअर अकील होसेन याने 4 विकेट्स घेत फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. चेन्नईसमोर मुंबईचा डाव हा 19 ओव्हरमध्ये 104 रन्सवर आटोपला. चेन्नईने अशाप्रकारे 103 धावांच्या फरकाने सामना नावावर केला. चेन्नईचा हा धावांबाबत इतिहासातील सर्वात मोठा विजय ठला. तर मुंबईचा धावांबाबत हा सर्वात मोठा पराभव ठरला. तसेच मुंबईचा हा या मोसमातील एकूण पाचवा तर वानखेडे स्टेडियममधील सलग आणि एकूण तिसरा पराभव ठरला.

संजू सॅमसन आणि इम्पॅक्ट प्लेअर अकील होसेन हे दोघे चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. संजूने केलेल्या शतकी खेळीमुळे चेन्नईला मुंबईसमोर 200 पेक्षा अधिक धावांचं आव्हान ठेवता आलं. तर फिरकीपटू अकील होसेन याने 4 विकेट्स घेत मुंबईच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. संजूने नाबाद 101 धावा केल्या. संजूने यापैकी 76 धावा या चौकार आणि षटकाराच्या मदतीने केल्या. संजूने या खेळीत 10 चौकार आणि 6 षटकार लगावले. संजूला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

सामन्यात काय झालं?

मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईसाठी संजूच्या शतकाव्यतिरिक्त इतर कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 22 तर डेवाल्ड ब्रेव्हीस याने 21 धावांचं योगदान दिल. तर इतरांपैकी कुणालाही 20 हा आकडा गाठता आला नाही. मुंबईसाठी अश्वनी कुमार आणि अल्लाह गजनफर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मिचेल सँटनर आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 1-1 फलंदाजाला आऊट केलं.

मुंबईचे फलंदाज फ्लॉप

मुंबईच्या फलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करताना निराशा केली. पलटणच्या 3 प्रमुख फलंदाजांना भोपळा फोडता आला नाही. दानिश मालेवार, नमन धीर आणि शेरफेन रुदरफोर्ड हे तिघे आले तसेच गेले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा जोडीने 56 चेंडूत 76 धावांची भागीदारी करुन विजयाची आशा कायम ठेवली होती. मात्र हे दोघे आऊट झाल्यानंतर मुंबईचा पराभव निश्चित झाला.

स्कोअरकार्ड

मुंबईसाठी तिलक वर्मा याने सर्वाधिक 37 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 36 धावा जोडल्या. या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. चेन्नईसाठी अकील व्यतिरिक्त इतर 5 गोलंदाजांनीही योगदान दिलं. नूर अहमद याने 2 विकेट्स मिळवल्या. तर मुकेश चौधरी, अंशुल कंबोज, जेमी ओव्हरटन आणि गुरनजरप्रीत सिंह या चौकडीने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?