AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs PBKS : श्रेयस-प्रभसिमरनचा तडाखा, पंजाबचा 7 विकेट्सने जबरदस्त विजय, मुंबईचा सलग चौथा पराभव

Mumbai Indians vs Punjab Kings Match Result IPL 2026 : पंजाब किंग्स टीमने आयपीएल 2026 स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखत एकूण चौथा विजय मिळवला आहे. पंजाबने मुंबई इंडियन्सवर एकतर्फी विजय साकारला.

MI vs PBKS : श्रेयस-प्रभसिमरनचा तडाखा, पंजाबचा 7 विकेट्सने जबरदस्त विजय, मुंबईचा सलग चौथा पराभव
Prabhsimran Singh and Shreyas Iyer MI vs PBKSImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 16, 2026 | 11:34 PM
Share

पंजाब किंग्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) विजयी घोडदौड यशस्वीरित्या कायम राखली आहे. पंजाबने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात गुरुवारी 16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदनात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. क्विंटन डी कॉक याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पंजाबसमोर 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबने हे आव्हान 21 बॉलआधी पूर्ण केलं. पंजाबने 16.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 198 रन्स केल्या. पंजाबचा हा सलग दुसरा तर एकूण चौथा विजय ठरला. कॅप्टन श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंह या दोघांनी पंजाबच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन पंजाबला एकतर्फी विजय मिळवून दिला.

पंजाबने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. रायन रिकेल्टन आणि सूर्ययकुमार यादव या दोघांनी घोर निराशा केली. रायने 2 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर सूर्यकुमार यादव पहिल्या बॉलवर आऊट झाला. अर्शदीप सिंह याने या दोघांचा कार्यक्रम केला. त्यानंतर नमन धीर आणि क्विंटन डी कॉक या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी 68 बॉलमध्ये 122 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र शेवटच्या फलंदाजांनी योगदान न दिल्याने मुंबईला द्विशतक करता आलं नाही.

पंजाबसमोर मुंबईच्या फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. क्विंटन डी कॉक याने सर्वाधिक आणि नाबाद 112 धावा केल्या. नमन धीर याने 31 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. तर कॅप्टन हार्दिक पंड्या याने 14 धावा जोडल्या. तर इतर तिघांनी निराशा केली. पंजाबसाठी अर्शदीप सिंह याने 3 विकेट्स मिळवल्या. तर मार्को यान्सेन आणि शशांक सिंह या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

स्कोअरकार्ड

पंजाबची बॅटिंग

पंजाबसाठी प्रियांश आर्या 15 आणि कूपर कॉनोली याने 17 रन्स केल्या. त्यानंतर श्रेयस आणि प्रियांश या दोघांनी 66 चेंडूत 139 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीने पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. श्रेयस अय्यर याने सलग तिसरं अर्धशतक झळकावलं. श्रेयसने 35 चेंडूत 66 रन्स केल्या. तर प्रभसिमरन आणि मार्कस स्टोयनिस या दोघांनी पंजाबला विजयापर्यंत पोहचवलं. प्रभसिमरनने 39 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या. तर मार्कस स्टोयनिस याने नाबाद 10 धावांची खेळी केली. मुंबईसाठी अल्लाह गजनफर याने 2 विकेट्स मिळवल्या. तर शार्दुल ठाकुर याने 1 विकेट मिळवली.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा