MI vs SRH : रायन रिकेल्टनचं विक्रमी शतक, वानखेडेत तिलकसह जयसूर्याचा रेकॉर्ड ब्रेक
Ryan Rickelton Century : रायन रिकेल्टन याने सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करत शतक झळकावलं. रायनने या शतकासह मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. जाणून घ्या रायनने कोणता विक्रम आपल्या नावावर केला.

मुंबई इंडियन्सचा स्टार ओपनर रायन रिकेल्टन याने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 41 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध धमाका केला आहे. रायनने वानखेडे स्टेडियममध्ये चाबूक शतक झळकावलं आहे. रायन यासह 19 व्या मोसमात शतक करणारा एकूण आठवा तर मुंबईचा तिसरा फलंदाज ठरला आहे. तसेच मुंबई एका हंगामात 3 शतकं करणारी दुसरी टीम ठरली आहे. मुंबईआधी सनरायजर्स हैदराबादने अशी कामगिरी केली आहे.
रायन रिकेल्टन याचं रेकॉर्डब्रेक शतक
नितीश कुमार रेड्डी याने टाकलेल्या 15 व्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेतली. रायनने अशाप्रकारे 44 चेंडूत शतक पूर्ण केलं. रायनने या 227.27 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. रायनने या दरम्यान 7 षटकार आणि 8 चौकार लगावले. रायनचं हे टी 20 कारकीर्दीतील चौथं आणि आयपीएलमधील पहिलं शतक ठरलं.
रायनने शतकासह कुणाला पछाडलं?
रायन मुंबईसाठी आयपीएल स्पर्धेत वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रायनने मुंबईसाठी वेगवान शतकाबाबत तिलक वर्मा, सनथ जयसूर्या, कॅमरुन ग्रीन आणि सूर्यकुमार यादव आणि यांना मागे टाकलं आहे. रायनने यासह 18 वर्षांआधीचा विक्रम मोडीत काढला आहे.रायनने तिलक वर्मा आणि सनथ जयसूर्या या दोघांना आयपीएल स्पर्धेत मुंबईसाठी वेगवान शतकाबाबत मागे टाकलं आहे. रायनने तिलक आणि सनथच्या तुलनेत 1 बॉलआधी शतक पूर्ण केलं आहे. तिलकने अवघ्या काही दिवसांआधी 45 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. तर सनथ जयसूर्या याने आयपीएलच्या पहिल्याच मोसमात 2008 साली 45 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं. तर रायनने आता 44 चेंडूत शेकडा पूर्ण केलाय.
स्कोअरकार्ड
मुंबई इंडियन्ससाठी वेगवान शतक करणारे फलंदाज
रायन रिकेल्टन, 44 बॉल, विरुद्ध हैदराबाद, मुंबई, 2026
तिलक वर्मा, 45 बॉल, विरुद्ध गुजरात टायटन्स, अहमदाबाद, 2026
सनथ जयसूर्या, 45 बॉल, विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, मुंबई, 2008
कॅमरुन ग्रीन, 47 बॉल, विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, मुंबई, 2023
सूर्यकुमार यादव, 49 बॉल, विरुद्ध गुजरात टायटन्स, मुंबई, 2023
19 व्या मोसमातील शतकवीर
दरम्यान आतापर्यंत 19 व्या मोसमात मुंबईसाठी रायनआधी तिलक वर्मा आणि क्विंटन डी कॉक या दोघांनी शतक लगावलं आहे. तसेच या दोघांव्यतिरिक्त संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, केएल राहुल आणि साई सुदर्शन यांनीही शतक केलं आहे.