AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : आरसीबीला मोठ्या विजयानंतरही पहिलं स्थान नाहीच, दिल्लीच्या पराभवामुळे उलथापालथ

IPL 2026 Points Table : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिट्ल्सला पराभूत करत पॉइंट्स टेबलमधील आपला दबदबा कायम ठेवला आहे. मात्र आरसीबी पहिलं स्थान पटकावण्यात अपयशी ठरली आहे.

IPL 2026 Points Table : आरसीबीला मोठ्या विजयानंतरही पहिलं स्थान नाहीच, दिल्लीच्या पराभवामुळे उलथापालथ
Virat Kohli Rcb Huddle Talk IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 28, 2026 | 5:31 AM
Share

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 27 एप्रिलला दिल्ली कॅपिट्ल्सचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. आरसीबीचा हा या मोसमातील एकूण सहावा तर दिल्ली विरुद्धचा दुसरा विजय ठरला. तसेच आरसीबी यासह या 19 व्या हंगामात 6 सामने जिंकणारी पंजाब किंग्सनंतर दुसरी टीम ठरली. आरसीबीने 19 व्या हंगामातील 39 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर 9 विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिट्ल्सच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. दिल्लीची 6 आऊट 8 अशी वाईट स्थिती झाली होती. मात्र दिल्लीने जेमतेम 75 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आरसीबीने विजयी आव्हान हे 1 विकेट गमावून सहज पूर्ण केलं. या सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणती टीम कोणत्या स्थानी आहे? हे जाणून घेऊयात.

आरसीबीच्या नेट रनरेटमध्ये जबरदस्त वाढ

आरसीबी सामन्याआधी पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी होती. तर दिल्ली कॅपिट्ल्स सातव्या क्रमांकावर विराजमान होती. सामन्यानंतरही दोन्ही संघ आहेच त्या स्थानी आहेत. दोन्ही संघांच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने आरसीबीच्या नेट रनरेटमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तर दिल्लीला फटका बसला आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, आरसीबीच्या खात्यात 8 सामन्यानंतर 12 गुण आहेत. तर आरसीबीचा नेट रनरेट हा +1.919 असा आहे जो इतर 9 संघांपेक्षा सर्वोत्तम आहे. सामन्याआधी आरसीबीचा नेट रनरेट हा +1.101 असा होता. तर दिल्लीचा 8 सामन्यांनंतर हा तिसरा पराभव ठरलाय. दिल्लीच्या खात्यात 6 गुण आहेत. दिल्लीचा नेट रनरेट पराभवानंतर -1.060 असा झालाय जो आधी -0.184 असा होता. दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. तर पंजाब किंग्स पहिल्या स्थानी आहे. पंजाबला अजून कुणीच हटवण्यात यशस्वी ठरला नाहीय. तसेच पंजाब या मोसमात आतापर्यंत अजिंक्य आहेत.

पंजाबचा दबदबा कायम

पंजाबच्या खात्यात 7 सामन्यानंतर 13 गुण आहेत. पंजाबचा 1 सामना हा पावसामुळे वाया गेला होता. पंजाबनंतर गतविजेता आरसीबी दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघात फक्त 1 गुणाचा फरक आहे. आरसीबीच्या नावावर 12 गुण आहेत. सनरायजर्स हैदराबाद 10 गुणांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

राजस्थान रॉयल्स चौथ्या तर गुजरात टायटन्स पाचव्या स्थानी आहे. चेन्नई सुपर किंग्स सहाव्या स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिट्ल्सचा पॉइंट्स टेबलमध्ये सातवा नंबर आहे. केकेआर आठव्या तर मुंबई इंडियन्स नवव्या स्थानी आहे. तर लखनौ सुपर जायंट्स शेवटून पहिल्या अर्थात दहाव्या क्रमांकावर आहे.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान...
Mumbai Rain Update | प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत