AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : राजस्थानचा विजयी षटकार, श्रेयससेनेला रोखलं, पंजाब पराभवानंतर कितव्या स्थानी?

IPL 2026 Points Table, IPL 2026 Points Table 40TH Match : अखेर राजस्थान रॉयल्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात पंजाब किंग्सला पराभूत करणारी पहिली टीम ठरली आहे. राजस्थानला पंजाब विरुद्धच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे.

IPL 2026 Points Table : राजस्थानचा विजयी षटकार, श्रेयससेनेला रोखलं, पंजाब पराभवानंतर कितव्या स्थानी?
Punjab Kings vs Rajatshan RoyalsImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 29, 2026 | 3:22 AM
Share

श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आपल्या मोहिमेतील पहिल्या 7 सामन्यात दबदबा कायम ठेवला होता. पंजाबने 7 पैकी 6 सामन्यांत विजय मिळवला होता. तर पंजाबचा 1 सामना पावसाने वाया घालवला. त्यामुळे राजस्थान रॉयल्स यजमान पंजाब किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानात आणि मोहिमेतील आपल्या आठव्या सामन्यात पराभूत करणार का? याकडे लक्ष लागून होतं. राजस्थानने हे आव्हान यशस्वीरित्या पेललं. राजस्थानने होम टीम पंजाबला न्यू चंडीगडमधील मुल्लानपूर येथील स्टेडियममध्ये 28 एप्रिलला सलग आणि एकूण तिसऱ्यांदा पराभूत केलं. राजस्थानने या विजयासह विजयी षटकार लगावला. तर पंजाबचा हा 19 व्या पर्वातील पहिला पराभव ठरला. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये अदलाबदल झाली आहे. या निमित्ताने कोणता संघ कोणत्या स्थानी आहे? हे जाणून घेऊयात.

पंजाबचं अव्वल स्थान कायम

पंजाबला या पराभवामुळे पॉइंट्स टेबलमध्ये नेट रनरेटचा अपवाद वगळता कोणतंही नुकसान झालेलं नाही. पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. पंजाबचं नेट रनरेट पराभवानंतर +1.043 असं झालंय जे सामन्याआधी +1.333 असं होतं.

राजस्थानची तिसऱ्या स्थानी झेप, हैदराबादला फटका

पंजाब विरुद्ध राजस्थान सामन्याच्या निकालाचा गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमवर कोणताही परिणाम झालेला नाही. आरसीबी दुसऱ्या स्थानी कायम आहे. आरसीबीच्या खात्यात 8 सामन्यानंतर 12 गुण आहेत. पंजाबला पराभूत केल्याने राजस्थानला पॉइंट्स टेबलमध्ये 1 स्थानाने फायदा झाला आहे. राजस्थानने चौथ्यावरुन तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. राजस्थानच्या खात्यात 9 सामन्यानंतर 12 गुण झाले आहेत. राजस्थानच्या नेट रनरेटमध्ये सुधार झालाय. ताज्या आकडेवारीनुसार, राजस्थानचा नेट रनरेट हा +0.617 असा झाला आहे जो आधी +0.602 असा होता.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

सनरायजर्स हैदराबादची चौथ्या स्थानी घसरण

राजस्थानच्या विजयामुळे सनरायजर्स हैदराबादची तिसऱ्या स्थानावरुन चौथ्या स्थानी घसरण झालीय. हैदराबादने आतापर्यंत 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादला 3 सामने गमवावे लागले आहेत. हैदराबादच्या खात्यात 10 गुण आहेत. पंजाब-राजस्थान सामन्याच्या निकालाचा फक्त तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघावरच परिणाम झाला आहे. त्या व्यतिरिक्त पॉइंट्स टेबलमधील इतर संघांची स्थिती आहे तशीच आहे. पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी गुजरात टायटन्स आहे. गुजरातने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर गुजरातला तितक्याच सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है