IPL 2026, RCB vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला…
आयपीएल 2026 स्पर्धेतील 26वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. अक्षर पटेल काय म्हणाला ते जाणून घेऊयात

आयपीएल 2026 स्पर्धेतील 26वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. आरसीबीचा हा आयपीएलमधील 100 वा सामना असल्याने खास आहे. तसेच आजच्याच दिवशी आयपीएल स्पर्धेला 18 वर्षांपूर्वी सुरूवात झाली होती. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. आरसीबी संघ 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, त्यामुळे हा सामना जिंकून पहिलं स्थान गाठण्याचा मानस असणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ 4 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार अक्षर पटेल याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दिल्ली कॅपिटल्स कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, मी प्रथम गोलंदाजी करणार आहे. खेळपट्टी चांगली आणि कठीण दिसत आहे. चिन्नास्वामी हे अर्थातच धावांचा पाठलाग करण्यासाठी एक चांगले मैदान आहे. आम्ही त्याच संघासह मैदानात उतरणार आहोत. जर तुम्ही जिंकत असाल, तर ही विश्रांती वाईट ठरू शकते. पण आम्ही मागील दोन सामने हरल्यामुळे, या विश्रांतीने आम्हाला पुन्हा संघटित होण्यास मदत केली. आता आम्ही एक संघ म्हणून पुन्हा एकत्र आलो आहोत आणि नव्या जोमाने सुरुवात करण्यास तयार आहोत. अर्थातच आम्ही प्रतिस्पर्धी संघाकडे लक्ष ठेवून आहोत, पण आम्ही आमच्या स्वतःच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि आमच्या योजनांवर ठाम आहोत. आम्ही आमच्या योजनांचे पालन करू आणि पाहू काय होते.
रजत पाटीदार म्हणाला की, मला आनंद आहे. कारण आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती. आम्ही धावफलकावर एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे प्रोत्साहन देण्यासाठी हीरवी जर्सी आहे. आम्ही त्याच संघासह खेळत आहोत.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, केएल राहुल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, औकिब नबी दार, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेजलवुड.
