AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Venkatesh Iyer: वेंकटेश अय्यर ठरला पंजाब किंग्सच्या पराभवाचा सूत्रधार, सामन्यानंतर म्हणाला की…

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात वेंकटेश अय्यरची बॅट चांगलीच तळपली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे आरसीबीने 222 धावांचा पल्ला गाठला. त्यासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारने गौरविण्यात आलं. सामन्यानंतर त्याने आपलं म्हणणं मांडलं.

Venkatesh Iyer: वेंकटेश अय्यर ठरला पंजाब किंग्सच्या पराभवाचा सूत्रधार, सामन्यानंतर म्हणाला की...
Venkatesh Iyer: वेंकटेश अय्यर ठरला पंजाब किंग्सच्या पराभवाचा सूत्रधार, सामन्यानंतर म्हणाला की...Image Credit source: PTI
| Updated on: May 17, 2026 | 9:03 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतही गतविजेत्या आरसीबीने चांगली कामगिरी केली आहे. पंजाब किंग्सला 23 धावांनी पराभूत करत प्लेऑफमध्ये जागा मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. आरसीबीच्या विजयात मोलाचा वाटा राहिला तो डावखुरा फलंदाज वेंकटेश अय्यरचा.. त्याच्या आक्रमक खेळीमुळे आरसीबीचा डाव मधल्या फळीत सावरला आणि 222 धावांपर्यंत मजल मारता आली. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी ठेवलेली धावगती वेंकटेश अय्यरने पुढे नेली. त्याने 40 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 73 धावा केल्या. त्याने 182.50 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. खरं तर या सामन्यात कर्णधार रजत पाटिदार नसल्याने वेंकटेश अय्यरला संधी देण्यात आली. त्याने चौथ्या स्थानी उतरून आपली भूमिका चोख बजावली. वेंकटेश अय्यरची सुरुवात संथ होती. त्याने 11 चेंडूत 9 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने चौकार आणि षटकारांचा वर्षावर केला.

वेंकटेश अय्यर सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाला की, ‘तांत्रिकदृष्ट्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असलेला हा माझा दुसरा सामना आहे आणि आज पहिल्यांदाच मला व्यवस्थित फलंदाजी करायला मिळाली. त्यामुळे सामनावीर पुरस्कार मिळण्यापेक्षा ही गोष्ट जास्त आनंददायी आहे. आणि सोबत दोन गुणही मिळाले, त्यामुळे खूप आनंद झाला आहे. मी केकेआरमध्ये बराच वेळ घालवला आहे, त्यामुळे हो, एक भावनिक नाते असेल, पण मला इथे खरोखरच घरासारखे वाटले आहे.’

वेंकटेश अय्यर पुढे म्हणाला की, ‘मी निराश नव्हतो किंवा मला खेळण्याची इच्छा नव्हती, असे मी म्हटले तर ते खोटे ठरेल. मला खरंच मैदानात उतरून खेळायची खूप इच्छा होती, कारण आमच्यासारख्या खेळाडूंसाठी आयपीएलमध्ये खेळण्याची ही एक संधी असते. आम्हाला खेळायचं असतं, आम्हाला चांगली कामगिरी करायची असते. पण मला हे समजतं, मी इथे इतका काळ राहिलो आहे की मला हे कळतं की हा एक चॅम्पियन संघ आहे आणि संघात बदल करणं नेहमीच योग्य नसतं. पण मला खेळवण्यासाठी मी नेहमीच कोचिंग स्टाफवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि मी चांगली कामगिरी करून दाखवेन. मला संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे.’

वेंकटेश अय्यरने सुरूवातीच्या संथ खेळीबाबत विश्लेषण करताना सांगितलं की, ‘मला वाटतं, हो, सुरुवातीला खेळ थोडा अडखळत होता, पण मी नशीबवान होतो की मला विराट कोहलीसोबत फलंदाजी करायला मिळाली. साहजिकच, तो तुमच्यापर्यंत जो मानसिकतेतील बदल पोहोचवू शकतो, तो महत्त्वाचा आहे. मला वाटतं, खेळातील सर्व दिग्गजांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते, ती म्हणजे संवाद, हीच गुरुकिल्ली आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला संवाद साधू शकलात, कारण मैदानात दोघे जण संघासाठी एकत्र धावा करत असतात, त्यामुळे तीच गुरुकिल्ली होती.मी इथे खेळत आलो आहे, पण या हंगामात मी खूप दिवसांनी खेळलो. खरं तर, लय पकडण्यासाठी मला सुरुवातीचे ते काही चेंडू आवश्यक होते. एकदा का मला खेळपट्टी समजली आणि गोलंदाजीवर हल्ला चढवण्याचे स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा ते माझ्यासाठी चांगलेच झाले, असे मला वाटते.’

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल