AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, RCB vs SRH: स्पर्धेच्या सुरूवातीलाच आरसीबीला मोठा धक्का, स्टार खेळाडू आऊट

आयपीएल 2026 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यापूर्वी आरसीबीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. त्याला कारणही तसंच आहे.

IPL 2026, RCB vs SRH: स्पर्धेच्या सुरूवातीलाच आरसीबीला मोठा धक्का, स्टार खेळाडू आऊट
IPL 2026, RCB vs SRH: स्पर्धेच्या सुरूवातीलाच आरसीबीला मोठा धक्का, स्टार खेळाडू आऊटImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 27, 2026 | 6:32 PM
Share

IPL 2026, RCB vs SRH: आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. हा सामना 28 मार्चला बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होत आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेकीचा कौल हा 7 वाजता होईल. या पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहे. असं असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे. कारण या स्पर्धेची विजयाने सुरूवात करायची आहे. पण स्टार खेळाडू सुरूवातीच्या सामन्यात खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. रॉयल चॅलेंजर्सचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूड पहिल्या सामन्यात खेळणार नाही. अजूनही त्याचं फिटनेस हवं तसं नाही. त्यामुळे पहिल्याच सामन्याला मुकणार आहे. खरं तर हेझलवूड गुरूवारी बंगळुरूत पोहोचला तेव्हा आनंदाचं वातावरण होतं. पण पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याने आरसीबीचे चाहते निराश झाले आहे.

आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी सांगितलं की, ‘आम्ही त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहोत.’ हेझलवूड दुखापतीमुळे बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. नोव्हेंबर 2025 पासून हेझलवूड क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. एशेज कसोटी मालिका आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळला नाही. त्याला हॅमस्ट्रिंग आणि अकिलीज टेंडनचा त्रास असून त्यातून अजून सावरलेला नाही. हेझलवूड हा आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या वर्षी त्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्यामुळे आरसीबीला जेतेपदाची चव पहिल्यांदा चाखता आली होती. मागच्या पर्वात त्याने आरसीबीसाठी 12 सामने खेळले होते आणि 22 विकेट घेतल्या होत्या. त्याचा इकोनॉमी रेट 8.77 चा होता.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफी सध्या हेझलवूडच्या जागी संघात आहे. त्यामुळे, जोपर्यंत हेझलवूडला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळत नाही, तोपर्यंत डफी संघात खेळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, दुखापतीतून सावरत असलेल्या नुवान थुशाराला पूर्णपणे बरा होईपर्यंत आयपीएलमध्ये खेळण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र नाकारले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अलीकडेच कठोर फिटनेस धोरण लागू केले आहे. श्रीलंका बोर्डाचा हा निर्णय आरसीबीसाठी एक मोठा धक्का आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा