KKR vs RR IPL 2022 Match Result: ‘करो या मरो’ मॅच, KKR विजयी, रिंकू-नितीशने फिरवला सामना, स्पेशल मूमेंटस नका चुकवू

KKR vs RR IPL 2022 Match Result: 'करो या मरो' सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर (KKR vs RR) सात विकेट राखून विजय मिळवला.

KKR vs RR IPL 2022 Match Result: 'करो या मरो' मॅच, KKR विजयी, रिंकू-नितीशने फिरवला सामना, स्पेशल मूमेंटस नका चुकवू
Kolkata Knight Riders TeamImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 12:17 AM

मुंबई: ‘करो या मरो’ सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर (KKR vs RR) सात विकेट राखून विजय मिळवला. नितीश राणा (48) (Nitish Rana) आणि रिंकू सिंह (42) (Rinku Singh) राजस्थानच्या विजयाचे हिरो ठरले. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात कोलकाताला विजय आवश्यक होता. नितीश आणि रिंकूने अर्धशतकीय भागीदारी केली. त्या बळावर विजय मिळवता आला. नितीशने षटकार ठोकून कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केकेआरचा मागच्या सलग पाच सामन्यात पराभव झाला होता. त्यामुळे आज विजय आवश्यक होता. कोलकाता नाइट रायडर्सचा हा चौथा विजय तर राजस्थान रॉयल्सचा चौथा पराभव आहे.

केकेआरची सुरुवात चांगली नव्हती

केकेआरसाठी आज सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. अवघ्या 16 रन्सवर एरॉन फिंचच्या रुपाने पहिली विकेट गेली. फिंचने फक्त चार धावा केल्या. दुसरा सलामीवीर बाबा इंद्रजीत 15 धावांवर आऊट झाला. 32 रन्समध्ये कोलकाताच्या दोन विकेट गेल्या होत्या. केकेआरच्या विजयाबद्दल साशंकता वाटत होती. त्यावेळी श्रेयस अय्यरने नितीश राणासोबत मिळून तिसऱ्याविकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली.

कोलकात्याच्या विजयाचा हिरो नितीश राणाची इनिंग चुकवू नका इथे क्लिक करा

Must Watch राजस्थान विरुद्ध केकेआर Highlights

युवा खेळाडूंनी सावरला डाव

श्रेयस सेट झालेला असताना तो बोल्टच्या गोलंदाजीवर सॅमसनकरवी झेलबाद झाला. श्रेयसने 34 धावा केल्या. यात तीन चौकार आणि एक षटकार होता. श्रेयस बाद झाल्यानंतर नितीश आणि रिंकून महत्त्वपूर्ण भागीदारी करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

संजू सॅमसनने सांगितलं पराभवाचं कारण क्लिक करा 

संजूची कॅप्टन इनिंग्स वाया

राजस्थान रॉयल्सने आज प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 152 धावा केल्या. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमधला आजचा 47 वा सामना झालाकेकेआरने चांगली गोलंदाजी केली. त्यांनी राजस्थान सारख्या बलाढ्य संघाला 153 धावांवर रोखलं. शिमरॉन हेटमायरने अखेरीस केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. राजस्थान रॉयल्सचा डाव अडचणीत असताना आज संजू सॅमसनने कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला. संजूने आज संघाच्या गरजेनुसार खेळ केला. त्याने 49 चेंडूत 54 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 1 षटकार होते. संजू खरंतर खूप वेगवान खेळतो. पण कोलकाताच्या गोलंदाजांनीही आज चांगला मारा करत थोडं जखडून ठेवलं होतं. शिवम मावीच्या गोलंदाजीवर सिंहने त्याचा सीमारेषेवर झेल घेतला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.