KKR vs RR, IPL 2022: श्रेयस अय्यरला आज मॅच जिंकावीच लागेल, टॉस मध्ये केकेआरने मारली बाजी

KKR vs RR, IPL 2022: मागच्या काही सामन्यांप्रमाणे केकेआरने आजही संघात बदल केले आहेत. वेंकटेश अय्यर आणि हर्षित राणाला वगळलं आहे. राजस्थानने टीममध्ये एक बदल केला असून करुण नायरला संघात संधी दिली आहे.

KKR vs RR, IPL 2022: श्रेयस अय्यरला आज मॅच जिंकावीच लागेल, टॉस मध्ये केकेआरने मारली बाजी
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 7:38 PM

मुंबई: IPL 2022 मध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (KKR vs RR) सामना होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयवर (Wankhede stadium) ही मॅच होतेय. आयपीएलमधला आजचा 47 वा सामना आहे. प्लेऑफच्या (Playoff) आशा जिवंत ठेवण्यासाठी केकेआरला आजचा सामना काहीही करुन जिंकणं आवश्यक आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केकेआरचा सलग पाच सामन्यात पराभव झाला आहे. हा संघ आठव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सच्या कामगिरीत सातत्य आहे. पण मागच्या सामन्यात त्यांचा मुंबई इंडियन्सने पराभव केला होता. संजू सॅमसनचा संघ प्लेऑफच्या दिशेने मजबुतीने पाऊल टाकतोय. हाच संघ आजच्या विजयाचा दावेदार आहे.

केकेआरच्या संघात दोघांना संधी

कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मागच्या काही सामन्यांप्रमाणे केकेआरने आजही संघात बदल केले आहेत. वेंकटेश अय्यर आणि हर्षित राणाला वगळलं आहे. राजस्थानने टीममध्ये एक बदल केला असून करुण नायरला संघात संधी दिली आहे. वेंकटेश आणि हर्षितच्या जागी शिवम मावी, अनुकूल रॉयला संधी दिली आहे. अनुकूल केकेआरकडून आयपीएलमध्ये डेब्यु करतोय.

KKR ची प्लेइंग – 11

श्रेयस अय्यर (कॅप्टन), एरॉन फिंच, नीतीश राणा, बाबा इंद्रजीत, आंद्रे रसेल, सुनील नरेन, अनुकूल रॉय, रिंकू सिंह, शिवम मावी, उमेश यादव, टिम साउदी,

राजस्थान रॉयल्सची प्लेइंग – 11

संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, करुण नायर, आर.अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन,

Non Stop LIVE Update
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.