AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RR IPL 2022 Match Result: रोहित शर्माला बर्थ डे गिफ्ट, बोल्टला इशानने खडेखडे मारलेला कडक SIX एकदा पहाच

MI vs RR IPL 2022 Match Result: हा विजय खास आहे. एकप्रकारे मुंबई इंडियन्सच्या टीमने रोहितला बर्थ डे गिफ्ट दिलं आहे. मुंबई इंडियन्सने हा सामना पाच विकेट आणि चार चेंडू राखून जिंकला.

MI vs RR IPL 2022 Match Result: रोहित शर्माला बर्थ डे गिफ्ट, बोल्टला इशानने खडेखडे मारलेला कडक SIX एकदा पहाच
Mumbai Indians won Image Credit source: IPL
| Updated on: May 01, 2022 | 12:08 AM
Share

मुंबई: IPL 2022 स्पर्धेत Mumbai Indians ने अखेर आपल्या विजयाचं खातं उघडलं आहे. स्पर्धेतील नवव्या सामन्यात खेळताना मुंबई इंडियन्सने पहिला विजय मिळवला. सलग आठ पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा हा पहिला विजय आहे. आज रोहित शर्माचा बर्थ डे आहे. त्यामुळे हा विजय खास आहे. एकप्रकारे मुंबई इंडियन्सच्या टीमने रोहितला (Rohit sharma) बर्थ डे गिफ्ट दिलं आहे. मुंबई इंडियन्सने हा सामना पाच विकेट आणि चार चेंडू राखून जिंकला. मुंबईच्या विजयात तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवमध्ये (Suryakumar Yadav) झालेली भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तिलक वर्माने 30 चेंडूत 35 धावा केल्या. डावाच्या अखेरीस टिम डेविडने छोटी पण तुफानी खेळी केली. या इनिगची सुद्धा मुंबईच्या विजयात छोटी भूमिका आहे.

मुंबईचा सूर्य तळपला, स्पेशल इनिंग क्लिक करुन पहा

पॉइंटस टेबलमध्ये काही फरक पडणार नाही

पहिल्या विजयामुळे मुंबईच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत. पण यामुळे पॉइंटस टेबलमध्ये काही बदलणार नाही. मुंबई इंडियन्सचा संघ तळालाच राहणार आहे तर राजस्थान रॉयल्सचा संघ दुसऱ्या स्थानावरच राहिलं. मुंबई इंडियन्सच प्लेऑफमधील आव्हान केव्हाच संपुष्टात आलय. आता फक्त त्यांना प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळायचं आहे.

जोस बटलरची शानदार हाफ सेंच्युरी

राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सहाबाद धावा केल्या. राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक 67 धावा केल्या. मुंबई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात जोस बटलरचीच बॅट तळपली होती. त्याने शतकी खेळी साकारली होती. आज त्याला तशी खेळी करता आली नाही. पण त्याने अर्धशतक मात्र जरुर झळकावलं.

क्लिक करुन पहा डॅनियल सॅम्सने मारलेला कडक विनिंग SIX

ट्रेंट बोल्टला इशान किशनने खडेखडे मारलेला कडक SIX चुकवू नका

त्याने 52 चेंडूत 67 धावा केल्या. यात पाच चौकार आणि चार षटकार होते.डावाच्या अखेरीस आर.अश्विनने फटकेबाजी केली. त्यामुळे राजस्थानला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. मुंबईकडून शौकीन, राइली मेरेडिथ यांनी प्रत्येकी दोन-दोन तर डॅनियल सॅम्स आणि कार्तिकेयने एक विकेट घेतला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.