AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, Purple Cap : युझवेंद्र चहलच्या डोक्यावरील मानाची कॅप या खेळाडूने घेतली हिरावून

आयपीएल स्पर्धेत गोलंदाजांसाठी पर्पल कॅप खूपच मानाची असते. एकीकडे गोलंदाजांची धुलाई होत असताना हा मान मिळवणं गौरवास्पद असतं. त्यामुळे गोलंदाजांची तिथपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरु आहे. पण या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून मुस्तफिझुर रहमान चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे पर्पल कॅपचा मान पुन्हा मिळाला आहे.

IPL 2024, Purple Cap : युझवेंद्र चहलच्या डोक्यावरील मानाची कॅप या खेळाडूने घेतली हिरावून
| Updated on: Apr 08, 2024 | 11:17 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. तसेच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची लढाईही चुरशीची होत आहे. पण पर्पल कॅपची शर्यत मात्र गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी होताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा मुस्तफिझुर रहमान याने हा मान पुन्हा मिळवला आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुस्तफिझुरने 4 गडी बाद केले होते. त्यानंतर पुढे प्रत्येक सामन्यात एखाद दोन विकेट घेत मानाची कॅप मिरवत राहिला. मात्र राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्र चहलने ही कॅप हिरावून घेतली होती. पण अखेर पुन्हा एकदा ही कॅप मिळण्यात मुस्तफिझुर रहमानला यश आलं आहे. मुस्तफिझुर रहमानने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 22 धावा देत 2 गडी बाद केले. त्यामुळे 9 विकेटसह अव्वल स्थान गाठलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या मुस्तफिझुर रहमानने पाच सामन्यात 8 च्या इकोनॉमीने 9 गडी बाद केले आहेत. यात 29 धावा देऊन 4 हा सर्वोत्तम स्पेल होता. राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्र चहलने 4 सामन्यात 6.35 च्या इकोनॉमीने 8 गडी बाद केले आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या खलील अहमदने 5 सामन्यात 8.50 च्या इकोनॉमीने 7 गडी बाद केले आहेत. गुजरात टायटन्सचा मोहित शर्मा या यादीचा चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 5 सामन्यात 8.68 च्या इकोनॉमीने 7 गडी बाद केले आहेत. तर मुंबई इंडियन्सचा गेराल्ड कोएत्झी पाचव्या स्थानी आहे. त्याने 4 सामन्यात 10.62 च्या इकोनॉमीने 7 गडी बाद केले आहेत.

कोलकात्याची विजयाची गाडी अखेर रुळावरुन घसरली आहे. चेन्नई सुपर किंग्सने होमग्राऊंडवर त्यांना पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे विजयाला खऱ्या अर्थाने ग्रहण लागलं आहे. कोलकात्याने 20 षटकात 9 गडी गमवून 137 धावा केल्या आणि विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने 17.4 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयामुळे चेन्नईला दोन गुण मिळाले आहेत.असं असलं तरी क्रमवारीत काही सुधारणा झालेली नाही. पण नेट रनरेट मात्र सुधारला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश थीक्षाना

एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.