IPL 2024 Purple Cap: पर्पल कॅपसाठी या दोन खेळाडूंमध्ये चुरस, कोण आघाडीवर ते जाणून घ्या

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : आयपीएल 2024 स्पर्धेतील 32 सामना पार पडला आहे. गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात धडाधड विकेट्स पडले. मात्र असं असूनही पर्पल कॅपच्या शर्यतीत काही फरक पडलेला नाही. पण खलिल अहमदच्या क्रमावारीत फरक पडला आहे.

IPL 2024 Purple Cap: पर्पल कॅपसाठी या दोन खेळाडूंमध्ये चुरस, कोण आघाडीवर ते जाणून घ्या
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 10:33 PM

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यानंतरही युझवेंद्र चहल पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे. युझवेंद्र चहलने 7 सामन्यात 12 गडी बाद केले असून 8.34 इकोनॉमी रेट आहे. तर दुसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आहे. त्यान 6 सामन्यात 10 गडी बाद केले असून 6.08 इतका इकोनॉमी रेट आहे. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात बुमराहने तीन गडी बाद केले तर अव्वल स्थान गाठेल. दिल्ली कॅपिटल्सचा खलिल अहमदने गुजरात टायटन्सविरुद्ध 1 गडी बाद करत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्याने 7 सामन्यात 10 गडी बाद केले असून 8.17 इतका इकोनॉमी रेट आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या मुस्तफिझुर रहमानने 5 सामन्यात 10 गडी बाद केले असून चौथ्या स्थानावर आहे. त्याचा इकोनॉमी रेट 9.15 इतका आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स पाचव्या स्थानावर असून त्याने 7.87 च्या सरासरीने 9 विकेट्स घेतले.

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात 33 वा सामना होणार आहे. या सामन्यात पर्पल कॅप मिळवण्याचा मान जसप्रीत बुमराहकडे आहे. तर गेराल्ड कोएत्झी याच्या नावावरही 9 विकेट्स आहेत त्यामुळे गोलंदाजी चालली तर अव्वल स्थान गाठू शकतो. तर पंजाब किंग्सच्या कगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंगच्या नावावर प्रत्येकी 9 विकेट्स आहेत. त्यामुळे या दोन गोलंदाजांनाही तितकीच संधी आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या षटकापासून दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यातून गुजरातचा संघ सावरलाच नाही. 17.3 षटकात सर्वबाद 89 धावा करता आहे. इतकं छोटं आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 8.5 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. यामुळे दिल्ली कॅपिटल्सला नेट रनरेटमध्ये जबर फायदा झाला आहे. तसेच गुणतालिकेत थेट नवव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.