AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Retirement | टीमला मोठा झटका, वनडे सीरिजदरम्यान ‘या’ विकेटकीपर खेळाडूची निवृत्तीची घोषणा

International Cricket Retirement | विकेटकीपर बॅट्समनने एकाएकी क्रिकेटला रामराम ठोकल्याने चाहत्यांना मोठा झटका लागला आहे.

Retirement | टीमला मोठा झटका, वनडे सीरिजदरम्यान 'या' विकेटकीपर खेळाडूची निवृत्तीची घोषणा
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: आयसीसी
| Updated on: Jul 28, 2023 | 9:17 PM
Share

मुंबई | क्रिकेट विश्वातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. स्टार खेळा़डूने एकाएकी तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय. धक्कादायक बाब म्हणजे 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु असताना या अनुभवी क्रिकेटरने असा निर्णय घेतला आहे. यामुळे टीम आणि या खेळाडूमध्ये काही बिनसलंय का, अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. आयसीसीने ट्विट करत या क्रिकेटरच्या निवृत्तीची माहिती दिली आहे.

आयर्लंड वूमन्स क्रिकेट टीमची विकेटकीपर बॅट्समन मॅरी वाल्ड्रोन हीने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मॅरीची 13 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द राहिली. मॅरीने 2010 मध्ये पदार्पण केलं होतं. विकेटकीपर बॅट्समन असलेल्या मॅरीने आपल्या कारकीर्दीत एकूण 148 जणांची विकेटमागून शिकार केली. आयर्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. मॅरीने या मालिकेतील तिसरा सामना खेळून निवृत्त होणार होती. मात्र दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं. त्यामुळे मॅरीने निवृत्ती जाहीर केली.

13 वर्षांनंतर क्रिेकेट कारकीर्दीला फुलस्टॉप

मॅरीची पहिली प्रतिक्रिया

“निवृत्ती जाहीर करणं हा माझ्यासाठी निश्चितच भावनिक क्षण आहे. मात्र मी माझ्या क्रिकेट जीवनात जे मिळवलंय ती माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, मला त्याबाबत गर्व आहे. मला देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली यासाठी मी आयर्लंड क्रिकेट मॅनेजमेंट, प्रशिक्षकांची आभारी आहे. मला या प्रवासात अनेकांनी मार्गदर्शन केलं. तसेच कायम पाठिंबा दिला यासाठी मी सर्वांचीच आभारी आहे”, अशी प्रतिक्रिया मॅरीने निवृत्तीनंतर दिली.

आई-वडिलांचे आभार

मॅरीने निवृत्ती जाहीर करताना आई-वडिलांच्या योगदानाचं उल्लेख करत त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला. “आई वडिलांनी मला कायमच साथ दिली. जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा मार्गदर्शन केलं. माझे आई-वडील हे दोघे मोठे समर्थक आहेत. आई-बाबांची मी आभारी आहे”, असं मॅरी म्हणाली.

प्रशिक्षकांकडून कौतुकाची थाप

आयर्लंड वूमन्स क्रिकेट टीमची कॅप्टन लॉरा डेलानी हीने मॅरीचं कौतुक केलं. “मॅरीची फार आठवण येईल, मात्र आता तिने जल्लोष करायला हवा”, असं लॉराने म्हटलं. तर कोच एड जॉयसनेही मॅरीबाबत 2 शब्द म्हटले. “मॅरी अशी क्रिकेटर आहे की ती आपल्या टीममध्ये हवीच, असं वाटतं”, असं एडने स्पष्ट केलं.

मॅरी वाल्ड्रॉन हीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

मॅरीने वनडे क्रिकेटमध्ये 56 सामन्यात आयर्लंडचं प्रतिनिधित्व केलं. मॅरीने या 56 सामन्यात 481 धावा केल्या. तर 88 टी 20 सामन्यांमध्ये 531 धावा केल्या. मॅरीचं 55 रन्स ही टी 20 मधील हायस्कोअर ठरला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.