ईशान किशन इंग्लंड दौऱ्यावर जाणार;दोघांच्या दुखापतीमुळे विकेटकीपर बॅट्समनला लॉटरी!
India Tour Of England 2025 : टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीची सुरुवात करणार आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामानंतर बीसीसीआयने 12 मे रोजी आयपीएलच्या 18 व्या मोसमातील उर्वरित 17 सामन्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. आयपीएल 2025 मधील अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे. या दरम्यान टीम इंडिया ए अनऑफिशियल टेस्टसाठी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. अनऑफिशियल टेस्टमधील पहिला सामना हा 30 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वात बीसीसीआयने 14 सदस्यीय संघ निश्चित केला आहे. ओपनर यशस्वी जयस्वाल आणि विकेटकीपर बॅट्समन ईशन किशन या दोघांचा 14 खेळाडूंमध्ये समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच हे दोघे इंग्लंड लायन्स विरुद्ध अनऑफिशियल टेस्ट मॅच खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. ईशान किशन याआधी संघात नव्हता. मात्र आयपीएलमध्ये 2 खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे ईशानला संधी मिळाली आहे.
नक्की कुणाला दुखापत?
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी अशा 14 खेळाडूंची निवड केलीय, ज्यांची टीम प्लेऑफसाठी क्वालिफाय करु शकणार नाही. त्या संघांचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्ठात येईल, अशाच टीममधील खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये ईशान किशन याचाही सामवेश आहे. ईशान अनऑफिशियल टेस्टमध्ये खेळताना दिसणार आहे. याआधी ईशानचा समावेश करण्यात आलेला नव्हता. मात्र आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि देवदत्त पडीक्कल या दोघांना झालेल्या दुखापतीमुळे ईशानला लॉटरी लागली.
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सुधारित वेळापत्रकामुळे फक्त एकाच सामन्यासाठी संघ निवडण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकामुळे एकाच वेळेस प्लेऑफ आणि इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात एकाच वेळेस सामने होत आहेत. पहिल्या अनऑफिशियल टेस्टनंतर शुबमन गिल, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या त्रिकुटाला दुसऱ्या सामन्यासाठी पाठवण्याची तयारी असल्याचं म्हटलं जात आहे.
तसेच टीम इंडिया इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेआधी सरावासाठी इंट्रा स्क्वाड अर्थात आपसात एक सामना खेळणार आहे. मात्र हा सामना 3 दिवसांचा असणार की 4? याबाबत निश्चितता नाही. रिपोर्ट्सनुसार, या सामन्यांचं प्रसारणही करण्याच येणार नाहीय.
करुण नायर यालाही संधी?
इशान किशन आणि यशस्वी जयस्वाल या दोघांव्यतिरिक्त करुण नायर यालाही संधी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. करुण नायर याने गेल्या काही महिन्यांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलीय. तसेच करुण सध्या आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिट्ल्सकडून खेळत आहे. करुणही पहिल्या अनऑफिशियल टेस्टमध्ये असणार आहे.
तनुश कोटीयन, आकाश दीप, खलील अहमद, अंशुल कंबोज, नीतीश कुमार रेड्डी, अभिमन्यु ईश्वरन, ध्रुव जुरेल, शार्दुल ठाकुर आणि मानव सुथार हे देखील पहिल्या अनऑफिशियल टेस्टमध्ये असणार आहेत. तर सर्फराज खान इंडिया ए टीमसह जाणार नाहीत. सर्फराजला दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्याला मुकावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.