AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते माझ्या बायकोच्या वाढदिवसाचं गिफ्ट होतं’, ट्रेंट बोल्टने सोडलेल्या कॅचबाबत सूर्यकुमार यादवचं मिश्कील उत्तर

सूर्यकुमारने 40 चेंडूत 62 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने सहा चौकार आणि तीन षटकार लगावले. या खेळीच्या जोरावर भारताने 165 धावांचे लक्ष्य पाच गडी राखून पूर्ण केले.

'ते माझ्या बायकोच्या वाढदिवसाचं गिफ्ट होतं', ट्रेंट बोल्टने सोडलेल्या कॅचबाबत सूर्यकुमार यादवचं मिश्कील उत्तर
Suryakumar Yadav - Rishabh Pant
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 2:05 PM
Share

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड (INDvsNZ) यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात भारताने पाच गडी राखून विजय मिळवला आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियम (SMS) येथे हा सामना खेळवण्यात आला. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि नवा कर्णधार रोहित शर्मा यांनी शानदार खेळी साकारली. टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर भारतीय संघाने विजयासह नवी सुरुवात केली आहे. (it was Perfect Gift From Boult On My Wife’s Birthday, Suryakumar Yadav On Dropped Catch)

3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 164 धावा केल्या होत्या. भारताने या धावांचा पाठलाग करताना सुरुवातीपासून चांगला खेळ दाखवला. सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माने उत्तम खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. रोहितने 36 चेंडूक 48 धावा केल्या. तर सूर्यकुमारने सर्वाधिक 40 चेंडूत 62 धावा केल्या. या दोघांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर मात केली.

सूर्यकुमारने 40 चेंडूत 62 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने सहा चौकार आणि तीन षटकार लगावले. यासह भारताने 165 धावांचे लक्ष्य पाच गडी राखून पूर्ण केले. पण या सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवला एक जीवदानही मिळाले होते. तो 57 धावांवर असताना ट्रेंट बोल्टने त्याचा झेल सोडला आणि सूर्यकुमारला चार धावादेखील मिळाल्या. या धावा आणि झेल सोडणं न्यूझीलंडला जड गेलं, कारण भारताला शेवटच्या षटकात फक्त 10 धावांची गरज होती. सूर्याचा झेल सुटला नसता, तर या धावा अधिक होऊ शकल्या असत्या आणि मग भारताचा रस्ता अवघड झाला असता. सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादव गंमतीने म्हणाला की, आज त्याच्या पत्नीचा वाढदिवस आहे, म्हणून त्याच्या मुंबई इंडियन्स संघातील सहकाऱ्याने त्याला भेट दिली. सुर्या आणि बोल्ट दोघेही गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये टीम मुंबई इंडियन्समध्ये एकत्र खेळत आहेत.

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त बोल्टचं गिफ्ट

सूर्यकुमार यादव सामन्यानंतर समालोचकांशी संवाद साधताना म्हणाला, “मला सामना संपवायचा होता पण तसे होऊ शकले नाही, आणि तुम्ही ट्रेंटने सोडलेल्या कॅचबद्दल बोलत असाल तर, मी सांगेन की आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे आणि त्याच्याकडून (बोल्ट) हे चांगलं गिफ्ट होतं.” जयपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात सूर्याला नंतर ट्रेंट बोल्टनेच त्रिफळाचित केलं. भारतीय डावाच्या 17 व्या षटकात सूर्याने बोल्टच्या चेंडूवर स्लॉग स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, मात्र किवी गोलंदाजाच्या वेगानं सूर्याच्या दांड्या उडवल्या.

निर्णायक क्षणी पंतचा चौकार

सूर्या बाद झाल्यानंतर भारताला लक्ष्य गाठण्यात काहीशी अडचण आली. तो बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर दोघेही झटपट बाद झाले. ज्यामुळे अखेरच्या अखेरच्या 3 चेंडूत भारताला विजयासाठी 3 धावांची गरज होती. अशा वेळी आक्रमक फलंदाज ऋषभ पंतने चौकार लगावत सामन्यात विजय मिळवला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 टी-20 सामने खेळवले जाणार असून यातील पहिला सामना भारताने जिंकल्याने भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. यानंतर पुढील दोन सामन्यानंतर उभय संघांमध्ये 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

इतर बातम्या

T20 World Cup 2021 मध्ये भारतीय संघात स्थान न मिळालेल्या चहलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

ICC कडून सौरव गांगुलीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, क्रिकेटशी संबंधित नियम-कायदे बनवणार

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार? क्रीडा मंत्र्यांची सावध प्रतिक्रिया

(it was Perfect Gift From Boult On My Wife’s Birthday, Suryakumar Yadav On Dropped Catch)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.