AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा भीमपराक्रम, वसीम अक्रमचा महारेकॉर्ड ब्रेक, ठरला पहिलाच गोलंदाज

Jasprit Bumrah Break Wasim Akram Record : जसप्रीत बुमराह याने इंग्लंडला दुसरा झटका देत बेन डकेट आणि ओली पोप ही जोडी फोडली. बुमराहने डकेटला आऊट करत दुसरी विकेट मिळवली. बुमराहने यासह इतिहास घडवला आहे.

ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा भीमपराक्रम, वसीम अक्रमचा महारेकॉर्ड ब्रेक, ठरला पहिलाच गोलंदाज
Team India Jasprit BumrahImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 21, 2025 | 11:09 PM
Share

टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास घडवला आहे. बुमराहने सामन्यातील दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला इंग्लंडला दुसरा झटका दिला. बुमराहने बेन डकेटला बोल्ड करत वैयक्तिक आणि एकूण दुसरी विकेट मिळवली. बुमराह यासह सेना देशात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. बुमराहने यासह पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम याचा रेकॉर्ड ब्रेक केला. बुमराहला या सामन्याआधी अक्रमला मागे टाकण्यासाठी अवघ्या 2 विकेट्सची गरज होती. बुमराहने पहिली विकेट घेताच या विक्रमाची बरोबरी केली. तर दुसरी विकेट घेताच इतिहास रचला.

इंग्लंडने टीम इंडियाला पहिल्या डावात 471 धावांवर रोखलं. इंग्लंडने टीम इंडिया विरुद्ध 41 धावांच्या मोबदल्यात शेवटच्या 7 विकेट्स घेतल्या. इंग्लंडने यासह टीम इंडियाला 500 धावा करण्यापासून रोखलं आणि कमबॅक केलं. त्यामुळे चाहत्यांना सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या गोलंदाजांकडून इंग्लंडच्या गोलंदाजांसाखीच कामगिरी अपेक्षित होती. बुमराहने भारताला तशीच अपेक्षित सुरुवात करुन दिली.

बुमराहने इंग्लंडला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला झटका दिला. बुमराहने सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर झॅक क्रॉली याला आऊट केलं. बुमराहने झॅकला 4 धावांवर स्लीपमध्ये करुण नायर याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे आता बुमराहला फक्त एका विकेटची गरज होती. बुमराहला दुसरी विकेट मिळाली होती. मात्र रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे टीम इंडियाला मोठा फटका बसला. जडेजाने बुमराहच्या बॉलिंगवर डकेटचा 15 धावांवर कॅच सोडला. त्यामुळे टीम इंडियासह चाहत्यांची निराशा झाली.

डकेटने या संधीचा चांगलाच फायदा घेतला. डकेट आणि ओली पोप या दोघांनी शतकी भागीदारी केली. जडेजाने सोडलेला कॅच भारताला चांगलाच महागात पडताना दिसत होता. तसेच ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. अशात बुमराहनेच इंग्लंडला दुसरा झटका दिला. बुमराहने 29 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर डकेटला बोल्ड केलं. बुमराहने यासह अक्रमचा रेकॉर्ड ब्रेक केला.

दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात (Sena) सर्वाधिक विकेट्स

  • जसप्रीत बुमराह : 60 इनिंग्स, 147 विकेट्स
  • वसीम अक्रम : 55 इनिंग्स, 145 विकेट्स
  • अनिल कुंबळे : 67 इनिंग्स, 141 विकेट्स
  • इशांत शर्मा, 71 इनिंग्स, 130 विकेट्स
  • मुथैय्या मुरलीथरन, 36 इनिंग्स, 125 विकेट्स
  • मोहम्मद शमी, 63 इनिंग्स, 123 विकेट्स
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.