IPL 2022 ‘हा’ मोठा खेळाडू मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होणार नाही, पराभवामुळे भंग पावलं स्वप्न

2018 च्या ऑक्शनमध्ये तो सहभागी झाला होता. पण कुठल्याही फ्रेंचायजीने त्याला विकत घेतलं नाही. अलीकडेच त्याने आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं.

IPL 2022 'हा' मोठा खेळाडू मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होणार नाही, पराभवामुळे भंग पावलं स्वप्न
(Source - Twitter)
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 3:04 PM

लंडन: नुकत्याच संपलेल्या अ‍ॅशेस मालिकेत (Ashes series) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 4-0 ने धुळ चारली. या पराभवामुळे जो रुटचं (joe root) आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये (Mega Auction) सहभागी होण्याचं स्वप्न भंग पावलं आहे. होबार्टमध्ये अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने कसोटी क्रिकेटमध्ये टीमचं नशीब पालटण्यासाठी सगळी ताकत पणाला लावणार असल्याचे संकेत दिले आहेत. सध्याच्या क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये जो रुटचा समावेश होतो. अजूनपर्यंत रुट आयपीएलमध्ये खेळलेला नाही.

पण कुठल्याही फ्रेंचायजीने त्याला विकत घेतलं नाही

2018 च्या ऑक्शनमध्ये रुट सहभागी झाला होता. पण कुठल्याही फ्रेंचायजीने त्याला विकत घेतलं नाही. अलीकडेच रुटने आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं. कसोटी क्रिकेटमध्ये कुठला अडथळा येणार नसेल, तर आपण या स्पर्धेत खेळू असं रुटने म्हटलं होतं.

IPL ला जबाबदार ठरवलं 31 वर्षाच्या जो रुटचं आयपीएलमध्ये सहभागी होणं, आता कठीण दिसतय. कारण इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटुंनी अ‍ॅशेसमधील पराभवासाठी IPL ला जबाबदार ठरवलं आहे. अलीकडेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाला काही सल्ले देण्यात आले होते. त्यात आयपीएलमध्ये खेळण्याचा कालावधी निश्चित करण्याचा मुद्दा होता. जो रुट ऑक्शनमध्ये सहभागी झाला, तर इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अडचणी वाढू शकतात.

टेस्ट क्रिकेटसाठी बलिदान देणार होबार्टमधील पराभवानंतर जो रुटने आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं म्हटलं आहे. आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमात दहा संघ आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये लिलाव होणार आहे. “इंग्लंडच्या कसोटी संघासाठी बरच काही करण्याची गरज आहे. मी पूर्ण ताकत लावली पाहिजे. मला जितकं बलिदान देणं, शक्य आहे, तितकं मी देईन. कारण आपल्या देशाच्या कसोटी क्रिकेटसाठी मी भरपूर विचार करतो. जिथे आपल्याला पोहोचायचे आहे, तिथे संघाला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करेन”

कर्णधारपद नाही सोडणार मागच्या वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडची वाईट स्थिती आहे. त्यामुळे रुटच्या कॅप्टनशिपबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. मला संघाच्या कर्णधारपदी कायम रहायचं आहे, असं रुटने सांगितलं.

संबंधित बातम्या: IND vs SA : एकदिवसीय मालिकेत कोणाचं पारडं जड? जाणून घ्या उभय संघांची आतापर्यंतची कामगिरी रोहित शर्मा होणार टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार, मात्र BCCI ची हिटमॅनसमोर महत्त्वाची अट सरावासाठी रोज पुणे-मुंबई प्रवास, भाड्याच्या घरात राहून सराव, लोणावळ्याच्या पठ्ठ्याचा U-19 World Cup मध्ये धुमाकूळ

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.