AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : जो रुटचा झंझावात सुरुच, सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड ब्रेक

Joe Root Break Sachin Tendulkar Record : इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची मालिका यशस्वीपणे सुरुच ठेवली आहे. रुटने लीड्समध्ये 2 धावा करुन सचिनचा आणखी एक विक्रम मोडीत काढला आहे.

ENG vs IND : जो रुटचा झंझावात सुरुच, सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड ब्रेक
Joe Root EnglandImage Credit source: PTI
| Updated on: Jun 21, 2025 | 11:43 PM
Share

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना हा लीड्समधील हेडिंग्ले इथे खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाच्या 3 फलंदाजांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर 471 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या तिघांनी शतक केलं. त्यानंतर इंग्लंडला प्रत्युत्तरात टीम इंडिया विरुद्ध चांगली सुरुवात करता आली नाही. जसप्रीत बुमराह याने झॅक क्रॉलीला इंग्लंडच्या डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये 4 धावांवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गमावल्यानंतर बेन डकेट आणि ओली पोप जोडीने इंग्लंडचा डाव सावरला आणि 100 पार पोहचवलं. इंग्लंडला बुमराहनेच दुसरा झटका दिला. बुमराहने इंग्लंडच्या डावातील 29 व्या ओव्हरमध्ये विकेट मिळवून दिली. बुमराहने बेन डकेट याला 62 धावांवर बाद केलं. त्यानंतर चौथ्या स्थानी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार जो रुट मैदानात आला. रुटने दुसरी धाव पूर्ण करताच इतिहास घडवला. रुटने टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड ब्रेक केला.

सचिन तेंडुलकर याचा महारेकॉर्ड ब्रेक

जो रुट इंग्लंडमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रुटने याबाबतीत सचिनला मागे टाकलं आहे. सचिन तेंडुलकर याने इंग्लंडमध्ये इंग्लंड विरुद्ध 17 कसोटी सामन्यांमध्ये 1 हजार 575 धावा केल्या होत्या. तर रुटने सचिनच्या तुलनेत 1 टेस्टआधीच हा कारनामा केला आहे.

इंग्लंडमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये सर्वाधिक धावा

  • जो रुट : 1 हजार 576* धावा
  • सचिन तेंडुलकर : 1 हजार 575 धावा
  • राहुल द्रविड़ : 1 हजार 376 धावा
  • एलिस्टर कुक : 1 हजार 196 धावा
  • सुनील गावसकर : 1 हजार 152 धावा

सनथ जयसूर्याचा रेकॉर्ड ब्रेक

तसेच जो रुट याने 8 धावा करताच श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या याचा विक्रम मोडीत काढला आहे. रुट जयसूर्याला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा नववा फलंदाज ठरला आहे. रुटच्या खात्यात आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 21 हजार 33 धावा झाल्या आहेत. तर सनथ जयसूर्या याने 21 हजार 32 धावा केल्या होत्या. तसेच सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने एकूण 34 हजार 357 धावा केल्या आहेत.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....