AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : आता कप आरसीबीचाच;मॅचविनर खेळाडू परतणार! कोण आहे तो?

Josh Hazlewood Royal Challengers Bengaluru IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची गेल्या 17 वर्षांपासूनची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा यंदा संपणार असल्याची चिन्हं आहेत. आरसीबीच्या गोटात मॅचविनर गोलंदाज परतण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.

IPL 2025 : आता कप आरसीबीचाच;मॅचविनर खेळाडू परतणार! कोण आहे तो?
Josh Hazelwood and Virat Kohli Rcb Ipl 2025Image Credit source: PTI
| Updated on: May 15, 2025 | 12:39 PM
Share

भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे आयपीएलचा 18 वा मोसम (IPL 2025) स्थगित करण्यात आलेला. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी झालेले विदेशी खेळाडू मायदेशी परतले. आता सर्व परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यानंतर बीसीसीआयकडून आयपीएल 2025 चं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्याला 17 मे पासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी प्लेऑफच्या शर्यतीत असणार्‍या आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला टेन्शन होतं. कारण, मॅचविनर बॉलर जोश हेझलवूड याच्या खेळण्याबाबत निश्चितता नव्हती. दोन्ही देशातील तणावाची स्थिती आणि दुखापत यामुळे जोशला आयपीएल 2025 मधील उर्वरित सामन्यांना मुकावं लागणार असल्याची अधिक शक्यता होती. मात्र आता जोश हेझलवूड खेळणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे कर्णधार रजत पाटीदार याच्यासह संपूर्ण आरसीबी टीमला मोठा दिलासा मिळाला आहे.

आरसीबीला सर्वात मोठा दिलासा

भारतातील परिस्थितीनंतर अनेक खेळाडू हे मायदेशी परतले. ऑस्ट्रेलियाचे खेळाडूंनीही भारत सोडलं आणि घरी रवाना झाले. मात्र त्यानंतर सर्व काही व्यवस्थित झालं. त्यामुळे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे मायदेशी परतलेले खेळाडू पुन्हा परतणार की नाही? अशी चर्चा रंगली होती. तसेच दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या निर्णयाला आमचा पाठींबा असेल, असं जाहीर केलं होतं. तर दुसऱ्या बाजूला जोश हेझलवूड याला खांद्याच्या दुखापतीचा त्रास जाणवत होता. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला होणार आहे. त्यामुळे जोश भारतात परतणार नसल्याचं जवळपास निश्चित होतं.

मात्र आता जोश उर्वरित सामन्यांसाठी आरसीबीसह जोडला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र जोश केव्हा परतणार? आरसीबीसह पुन्हा केव्हा जोडला जाणार? याबाबत कोणतीही अपडेट नाही. मात्र जोश परतणार असल्याने आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. कारण जोश बॉलिंग ग्रुपचं नेतृत्व करतोय. जोशने हा हंगामात आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केलीय.

जोशची कामगिरी

जोश हेझलवूड याने 18 वा मोसम स्थगित होईपर्यंत झालेल्या 10 सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. जोशने आरसीबीसाठी या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेतल्या. जोशने आरसीबीसाठी 10 सामन्यांमध्ये 17.27 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आरसीबीने 11 पैकी 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आरसीहीने 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.