Kho Kho WC 2025 : भारत वुमन्स संघाची अंतिम फेरीत धडक, उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेचा उडवला धुव्वा
खो खो वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा धुव्वा उडवला. यासह टीम इंडियाने पहिल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताचा अंतिम सामना नेपाळशी होणार आहे.

भारतीय महिला संघाने खो खो वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताने उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेचा धुव्वा उडवला. पहिल्या डावापासून भारताने चांगील कामगिरी केली होती. डिफेंस करताना भारताने दक्षिण अफ्रिकेला वरचढ होऊन दिलं नाही. भारताने दक्षिण अफ्रिकेचा 66-16 गुणांनी धुव्वा उडवला. भारताने हा सामना 50 गुणांच्या फरकाने जिंकला. अंतिम फेरीत भारताचा सामना नेपाळशी होणार आहे. हा सामना भारताने जिंकताच हिरव्या रंगाची ट्रॉफी आपल्या नावावर करेल. तसेच खो खो वर्ल्डकप जिंकण्याची संधी भारताला मिळणार आहे. त्यामुळे आता नेपाळ विरुद्ध भारत कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. 19 जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम डिफेंस करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला . कारण पहिल्या डावात भारताने 5 ड्रिम रन गुण मिळवले. दक्षिण अफ्रिकेच्या खात्यात अटॅक करूनही फक्त 10 होते. त्यामुळे पहिल्या डावात फक्त 5 गुणांचा फरक होता. दुसऱ्या डावात भारताने 33 गुण मिळवले आणि. त्यामुळे भारताकडे 23 गुणांचा फरक होता. तिसऱ्या डावात खरं तर दक्षिण अफ्रिकेला फरक कव्हर करण्याची संधी होती. पण तसं झालं नाही. भारताने या डावातही 5 ड्रीम रन गुण मिळवले. त्यामुळे तिसरा डाव हा 38-16 या फरकाने संपला. त्यामुळे या सामन्यावर भारताने पकड मिळवली. चौथ्या डावात भारताने अटॅक करत यात 28 गुणांची भर घातली. यासह भारताने हा सामना 66-16 या फरकाने जिंकला.
FULL TIME: Bharat 66 – South Africa 16
Bharat has made it to the FINALS of the first ever #KhoKhoWorldCup!!!! 🏆🌍
Let’s bring it home 🇮🇳#TheWorldGoesKho #SemiFinals #KKWC2025 #BharatvsSouthAfrica
— Kho Kho World Cup India 2025 (@Kkwcindia) January 18, 2025
भारतीय महिला संघ : प्रियांका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर, सुभाषश्री सिंग, मगाई माझी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नसरीन शेख, मीनू,मोनिका, नाझिया बीबी.
