KKR vs SRH : पॅट कमिन्सने पराभवानंतर बोलताना थेट या बॉलरचं नाव घेतलं, म्हणाला…..
Pat Cummins KKR vs SRH Ipl 2024 Final: आयपीएलच्या 17 व्या मोसमात चॅम्पियन होण्याचं सनरायजर्स हैदराबादचं स्वप्न स्वप्नच राहिलं. कोलकाताने हैदराबादचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. हैदराबादच्या पराभवानंतर कॅप्टन पॅट कमिन्सने कोणत्या गोलंदाजाचं नाव घेतलं?

पॅट कमिन्स याने आपल्या नेतृत्वात पहिल्याच झटक्यात आयपीएलच्या 17 व्या मोसमात सनरायर्स हैदराबादला अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं. मात्र हैदराबादला अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सला चितपट करता आलं नाही. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात पहिल्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलची ट्रॉफी उंचावली. केकेआरची 2014 नंतर आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची पहिली वेळ ठरली. कोलकाताने हैदराबादवर चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये 8 विकेट्सने विजय मिळवला. केकेआरने विजयासाठी मिळालेलं 114 धावांचं आव्हान हे 11 व्या ओव्हरमध्येच 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. त्याआधी केकेआरच्या गोलंदाजांनी हैदाराबादला 113 धावांवर गुंडाळलं. हैदराबादच्या पराभवानंतर कॅप्टन पॅट कमिन्सने पराभवावर प्रतिक्रिया दिली.
पॅट कमिन्स काय म्हणाला?
पॅट कमिन्सने पराभवानंतर कोलकाताच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. तसेच पॅटने केकेआरचा माजी सहकारी राहिलेल्या गोलंदाजाचा उल्लेख केला. “कोलकाताने शानदार गोलंदाजी केली. माजी सहकारी स्टार्सी (मिचेल स्टार्क) पुन्हा आला. आज रात्री आम्ही पूर्णपणे अपयशी ठरलो. सुरुवातीला काही चौकार मिळतील, अशी आशा असते. मात्र त्यांनी (केकेआरने) खरंच चांगली बॉलिंग केली, ज्यामुळे आम्हाला फटका बसला. केकेआरने अहमदाबादप्रमाणेच बॉलिंग केली. ही एक अवघड खेळपट्टी होती. आम्ही 160 धावा केल्या असत्या तर आम्ही सामन्यात कायम असतो. या हंगामात अनेक बाबी या सकारात्मक राहिल्या. आम्ही 3 वेळा 250 धावांपर्यंत पोहचलो. इथवर पोहचण्यसााठी कौशल्य लागतं. हा चांगला हंगाम होता”, असं पॅटने म्हटलं.
हैदराबादची राक्षसी बॅटिंग
दरम्यान सनरायजर्स हैदराबादने याआधी अखेरचा अंतिम सामना हा 2018 साली खेळला होता. मात्र त्यानंतर हैदराबादला प्लेऑफपर्यंत पोहचण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागला. मात्र पॅट कमिन्सने सूत्र हातात घेताच हैदराबादचा चेहरामोहरा बदलला. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड या सलामी जोडीने साखळी फेरीत विस्फोटक खेळी केली. हैदराबादने 3 वेळा 250 पार मजल मारली. मात्र हैदराबादचे फलंदाज निर्णायक क्षणी फ्लॉप ठरले.
कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग ईलेव्हन: श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: पॅट कमिन्स (कॅर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.
