KL Rahul : केएल राहुलचं विक्रमी अर्धशतक, गौतम गंभीरचा रेकॉर्ड ब्रेक, टीम इंडिया मोठ्या आघाडीच्या दिशेने
KL Rahul Break Gautam Gambhir Record : टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात माजी फलंदाज गौतम गंभीर याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा बर्मिंगहॅममधील ऐतिहासिक एजबेस्टन मैदानात खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाने इंगंलडला 407 रन्सवर ऑलआऊट करत 180 धावांची मोठी आघाडी मिळवली. त्यानंतर भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 64 रन्स केल्या. भारताने अशाप्रकारे 244 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर केएल राहुल आणि करुण नायर या नाबाद परतलेल्या जोडीने चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली.
केएल राहुलचं विक्रमी अर्धशतक
केएल राहुल तिसऱ्या दिवशी 28 धावांवर नाबाद परतला. केएलने चौथ्या दिवशी आणखी 22 धावा जोडल्या. केएलने यासह कसोटी कारकीर्दीतील 18 वं अर्धशतक पूर्ण केलं. तर केएलने अर्धशतकानंतर आणखी एक धाव घेतली. केएलने यासह हेड कोच आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर याचा रेकॉर्ड ब्रेक केला.
इंग्लंडच्या जोश टंग याने टाकलेल्या 28 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर केएलने 3 रन्स धावून घेतल्या आणि अर्धशतक पूर्ण केलं. केएलने 78 चेंडूत 64.10 च्या स्ट्राईक रेटने 50 धावा पूर्ण केल्या. केएलने अर्धशतकी खेळीत 9 चौकार ठोकले. केएलने त्यानंतर 29 व्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार लगावला. केएल यासह विदेशात कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा तिसरा सलामीवीर ठरला. केएलने याबाबतीत गौतम गंभीरचा रेकॉर्ड ब्रेक केला.
गौतम गंभीरचा रेकॉर्ड ब्रेक
केएल राहुल याची कसोटीत 50 पेक्षा अधिक धावा करण्याची ही 15 वी वेळ ठरली. तर गंभीरने त्याच्या कसोटी कारकीर्दीत 14 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून विदेशात सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम दिग्गज सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. तर दुसऱ्या स्थानी वीरेंद्र सेहवाग विराजमान आहे.
केएलचं 18 वं कसोटी अर्धशतक
FIFTY up for KL Rahul – his 18th in Test cricket 👍#TeamIndia‘s lead moves past the 300-run mark! 👌
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND | @klrahul pic.twitter.com/MJg8esvq9M
— BCCI (@BCCI) July 5, 2025
विदेशात भारतासाठी 50+ धावा करणारे भारतीय सलामावीर
सुनील गावसकर : 38
वीरेंद्र सेहवाग : 21
केएल राहुल : 15
गौतम गंभीर : 14
मुरली विजय : 12
केएल मोठी खेळी करण्यात अपयशी
दरम्यान केएलला या अर्धशतकाचं मोठ्या खेळीत रुपांतर करता आलं नाही. केएल अर्धशतकानंतर आऊट झाला. केएलने 84 बॉलमध्ये 10 फोरसह 55 रन्स केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला. जोश टंग याने केएलला बोल्ड केलं. भारताने यासह 126 धावांवर तिसरी विकेट गमावली.