BCCI : राहुल, कोहली, रोहित शर्मा T20 वर्ल्ड कपमधून बाहेर? 2007चा फॉर्म्यूला बीसीसीआय वापरणार?

आशिया चषकात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर आता बीसीसाआयकडून एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. हा निर्णय म्हणजे जुना फॉर्म्यूला आहे. हा फॉर्म्यूला नेमका काय आहे, ते जाणून घ्या...  

BCCI : राहुल, कोहली, रोहित शर्मा T20 वर्ल्ड कपमधून बाहेर? 2007चा फॉर्म्यूला बीसीसीआय वापरणार?
राहुल, कोहली, रोहित शर्मा T20 वर्ल्ड कपमधून बाहेर? Image Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 4:59 PM

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ड कपवर (T-20 world cup 2022) आता भारताची नजर आहे. आशिया चषकात भारतीय क्रिकेट टीमनं केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर आता बीसीसीआयनं काही निर्णय घ्यायला सुरुवात केल्याचं बोललं जातंय. आशिया कप (Asia Cup 2022) मधील भारताचा प्रवास सुपर 4 मध्येच संपला. सुपर 4 मध्ये भारताला फक्त अफगाणिस्तानवर विजय मिळाला. यापूर्वी त्यांना पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यादरम्यान, भारतीय संघात अनेक प्रयोग झाले, ते प्रयोग फ्लॉपही ठरले. आता टीम इंडियाच्या नजरा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपवर आहे. त्यामुळे आता लवकरच टीमची घोषणा होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी कोणाला मिळणार, कुणाला गाळलं जाणार, ही देखील सध्या चर्चा आहे. यातच आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ड कपसाठी भारत कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही. बीसीसीआय ( BCCI) एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तो निर्णय नेमका काय आहे, तो एक जून फॉर्म्यूला तर नाही ना, ते जाणून घ्या…

युवा संघाची निवड?

आकाश चोप्रा एका प्रश्नोत्तराच्या सत्रात सहभागी झाला होता. यावेळी चाहत्यांनी त्याला भारतीय क्रिकेटबद्दल प्रश्न विचारले. यावर त्यानंही सगळी आणि परिपूर्ण उत्तरं दिली. ही उत्तर आकाशनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर दिली. त्याच सत्रात आकाश चोप्राला एकानं विचारलं की टॉप 3 राहुल, कोहली आणि रोहित यांना वर्ल्डकपमधून वगळून युवा संघाची निवड करणे शक्य आहे का? यावर बोलताना आकाश म्हणाला की, ‘मी या गोष्टीशी अजिबात सहमत नाही. तिन्ही खेळाडूंनी विश्वचषकात खेळावे. चांगले व्यासपीठ मिळाले पाहिजे. विश्वचषकात आमचा चांगला गट आहे. मोठा सामना. त्यामुळे तिघांनीही खेळावे. खरं तर 2007 मध्ये, बीसीसीआयने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली एक नवीन आणि तरुण संघ टी-20 विश्वचषकासाठी पाठवला होता. त्यावेळी भारतानं पाकिस्तानचा पराभव करून पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. तिन्ही फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर केएल राहुल आणि रोहित शर्मा आशिया कपमध्ये खराब फॉर्ममध्ये नक्कीच झगडत होते. पण, विराट कोहली आशिया कपमध्ये फॉर्ममध्ये परतला. आशिया चषक स्पर्धेत त्याने 2 अर्धशतके आणि एक शतक झळकावले.

हा व्हिडीओ पाहा

हे सुद्धा वाचा

बीसीसीआय तो निर्णय घेणार?

आशिया चषक स्पर्धेतील संघाची कामगिरी पाहिल्यानंतर काही चाहत्यांना वाटू लागलं की बीसीसीआयनं 2007 च्या जुन्या फॉर्म्यूलाचा वापर करून केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा यांना टी-20 विश्वचषकातून बाहेर काढावं आणि एक नवीन आणि युवा संघ करावा. 2007 च्या T20 विश्वचषकाप्रमाणे तो पाठवला गेला पाहिजं, असंही चाहते म्हणतायत.

आता यावर क्रिकेट चाहत्यांचे वेगवेगळे मतं आहेत. तर क्रिकेटर्स देखील आपलं मत मांडताना दिसतायत.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.