SRH vs CSK, Head to Head: सनरायजर्स हैद्राबादची लढत बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्सशी, असे आहेत आतापर्यंतचे आकडे

आज आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील 44 वा सामना हा विशेष असणार आहे. कारण गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची लढत गुणतालिकेत सर्वात खाली असणाऱ्या सनरायजर्स हैद्राबादशी असेल. चेन्नई उत्तम खेळ करत असली तरी हैद्राबादनेही नुकताच एक सामना जिंकत पुनरागमन केलं आहे.

SRH vs CSK, Head to Head: सनरायजर्स हैद्राबादची लढत बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्सशी, असे आहेत आतापर्यंतचे आकडे
सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या हंगामातील (IPL 2021) 43 वा सामना आज सनरायजर्स हैद्राबाद  (SRH) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (CSK) यांच्यात खेळवला जाणार आहे. हैद्राबाद संघाला यंदाची आयपीएल अत्यंत खराब गेली आहे. त्यांनी यंदाच्या हंगामात 10 पैकी केवळ 8 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे धोनीची टीम नावाला साजेसा खेळ करत यंदाही गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास  प्लेऑफमधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित होईल.

दोन्ही संघाच्या गुणतालिकेतील स्थानाचा विचार करता चेन्नईच्या संघाने 10 पैकी 8 सामने जिंकत 16 गुणांसह पहिले स्थान गाठले आहे. तर हैद्राबादचा संघ 10 पैकी 2 सामना जिंकल्याने 4 पॉईंट्ससह शेवटच्या स्थानावर आहे. पण हैद्राबाद संघाने नुकताच एक सामना राजस्थानला पराभूत करत जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. ज्यामुळे चेन्नईला अधिक धोका आहे.

आतापर्यंतच्या सामन्यात चेन्नई पारडे जड

चेन्नई आणि हैद्राबादचे संघ आतापर्यंत 16 वेळा एकमेंकासोबत भिडले आहेत. त्यापैकी तब्बल 12 सामने जिंकत चेन्नईने एकहाती वर्चस्व गाजवले आहे. तर हैद्राबाद केवळ 4 सामने जिंकण्यात यशस्वी झाली आहे. दरम्यान राजस्थानला पराभूत करुन हैद्राबादने मिळवलेला विजय आजच्या सामन्यात मिळवण्यातही ते यशस्वी राहणार का हे पाहणे औत्सुक्याचे राहिल.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

चेन्नई सुपरकिंग्स –एमएस धोनी (कर्णधार-विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसी, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जॉश हेजलवुड

सनरायजर्स हैद्राबाद – डेव्हिड वॉर्नर, रिद्धिमान साहा  (यष्टीरक्षक), मनिष पांडे, केन विल्यमसन (कर्णधार), विराट सिंग, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा

हे ही वाचा

IPL 2021: विराटसेना सूसाट! मॅक्सवेलचं दमदार अर्धशतक, राजस्थानवर 7 गडी राखून विजय

IPL 2021: मुंबई इंडियन्स संघात बदल, अर्जुन तेंडुलकर स्पर्धेबाहेर, नव्या खेळाडूला संधी, ‘हे’ आहे कारण

IPL 2021 : मॉर्गनसोबतच्या वादावर आर. अश्विनचं सडेतोड उत्तर, टीकाकारांची पोलखोल करत केली बोलती बंद

(Know Head to head of todays match SRH vs CSK and Know probable playing 11 for Todays IPL Match)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI