AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs GT : साई सुदर्शनचा कारनामा, लखनौविरुद्धच्या सामन्यात खास ‘त्रिशतक’ पूर्ण, 18 व्या मोसमात अशी कामगिरी करणारा पहिलाच

Sai Sudharsan LSG vs GT Ipl 2025 : गुजरातचा युवा आणि डॅशिंग ओपनर याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आक्रमक खेळी करत अर्धशतक झळकावलं. साई यासह आयपीएलच्या 18 व्या मोसमात अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला.

LSG vs GT : साई सुदर्शनचा कारनामा, लखनौविरुद्धच्या सामन्यात खास 'त्रिशतक' पूर्ण, 18 व्या मोसमात अशी कामगिरी करणारा पहिलाच
Sai Sudharsan GT vs LSG Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 12, 2025 | 6:56 PM
Share

आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमात गुजरात टायटन्सच्या फलंदाजांची धमाकेदार कामगिरी सुरु आहे. गुजरातच्या साई सुदर्शन आणि कर्णधार शुबमन गिल या सलामी जोडीने 18 व्या मोसमातील 26 व्या सामन्यात शानदार सुरुवात केली. टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या शुबमन आणि साईने या संधीचा चांगला फायदा घेतला. सलामी जोडीने पावरप्लेमधील 6 ओव्हरमध्ये 54 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी पावरप्लेमध्ये धावा कुटल्या. त्यामुळे गुजरातला 10 ओव्हरमध्ये धावा करता आल्या. या दरम्यान कर्णधार शुबमन गिल याने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

शुबमन गिलनंतर साई सुदर्शन याने 11 व्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर चौकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं. साईचं हे या मोसमातील एकूण चौथं अर्धशतक ठरलं. साईने या हंगामातील 6 पैकी 4 सामन्यांत 50 पेक्षा अधिक धावा केल्या. साईचं गेल्या सामन्यात अवघ्या 1 धावेने अर्धशतक हुकलं होतं. साई आतापर्यंत या हंगामात फक्त एकदाच दुहेरी आकडा गाठू शकलेला नाही. यावरुन गुजरातची सलामी फलंदाज काय प्रकारची कामगिरी करत आहेत, याचा अंदाच लावता येऊ शकतो.

साई सुदर्शनची मोठी कामगिरी

साई आणि शुबमन या सलामी जोडीने 120 धावांची भागीदारी केली. शुबमन 60 धावा करुन आऊट झाला. शुबमननंतर काही वेळानी साई आऊट झाला. साईने 37 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 1 षटकारासह 56 धावांची खेळी केली. साईने या खेळीसह खाक कामगिरी केली. साईने या हंगामात 300 धावा पूर्ण केल्या. साई या मोसमात 300 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. साईच्या नावावर 151.61 च्या स्ट्राईक रेटने एकूण 329 धावा आहेत. साईनंतर मिचेल मार्श हाच एकमेव असा फलंदाज आहे ज्याने 4 अर्धशतकं केली आहेत.

आयपीएल 18 व्या मोसमात सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 बॅट्समन

  • साई सुदर्शन : 329
  • निकोलस पूरन : 288
  • मिचेल मार्श : 265
  • जोस बटलर : 213
  • शुबमन गिल : 208

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान आणि रवी बिश्नोई.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर आणि मोहम्मद सिराज.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.