AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Trade : मोहम्मद शमीसाठी दोन फ्रेंचायझींची फिल्डिंग, सनरायझर्स हैदराबादला मिळाली ट्रेड ऑफर

आयपीएल रिटेन्शन यादी जाहीर करण्याची तारीख जवळ येत असल्याने ट्रेड विंडोचा बाजार गरम झाला आहे. मुंबई इंडियन्सने दोन खेळाडूंना संघात ओढलं आहे. तर मोहम्मद शमीसाठी दोन फ्रेंचायझींनी ट्रेड विंडोच्या माध्यमातून फासे टाकले आहेत.

IPL 2026 Trade : मोहम्मद शमीसाठी दोन फ्रेंचायझींची फिल्डिंग, सनरायझर्स हैदराबादला मिळाली ट्रेड ऑफर
IPL 2026 Trade : मोहम्मद शमीसाठी दोन फ्रेंचायझींची फिल्डिंग, सनरायझर्स हैदराबादला मिळाली ट्रेड ऑफरImage Credit source: PTI
| Updated on: Nov 13, 2025 | 7:18 PM
Share

आयपीएल 2026 मिनी लिलावापूर्वी सर्व संघांना रिटेन्श यादी जाहीर करावी लागणार आहे. यासाठी 15 नोव्हेंबरची तारीख ठरली आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना धावाधाव सुरु झाली आहे. रिटेन्शन यादी जाहीर करण्यापूर्वी फ्रेंचायझी ट्रेड विंडोच्या माध्यमातून काही खेळाडूंची अदलाबदल करण्याची खेळी जोर धरत आहे. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सकडून खेळाडूंसाठी यशस्वी ट्रेड केलं आहे. आता मोहम्मद शमीबाबत चर्चांना उधाण आलं आहे. आयपीएल स्पर्धेत मोहम्मद शमी सध्या सनरायझर्स हैदराबाद संघात आहे. मात्र त्याच्यासाठी दोन संघांनी फासे टाकले आहेत. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सची त्याच्यावर नजर आहे. त्यामुळे काव्या मारनच्या संघाकडे ट्रेड करण्याची मोठी संधी आहे. कारण मोहम्मद शमीसाठी दोन संघ मैदानात असल्याने चांगली रक्कम मिळू शकते.

आयपीएल 2025 मेगा लिलावात मोहम्मद शमीसाठी सनरायझर्स हैदराबादने 10 कोटी मोजले होते. मात्र त्याची कामगिरी काही खास राहिली नव्हती. त्याने या स्पर्धेत फक्त 6 विकेट घेतल्या होत्या. रिपोर्टनुसार, मोहम्मद शमी कोणत्या खेळाडूऐवजी देण्यापेक्षा कॅश डीलवर जोर असणार आहे. कारण सनरायझर्स हैदराबादमध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. त्यामुळे संघाला तशी कोणाची गरज नाही. त्यामुळे मोहम्मद शमीची ट्रेड करून पैशांचं गणित सोडवू शकते. आता ही डील कशी होते हे येत्या काही तासात स्पष्ट होईल. लखनौ सुपर जायंट्सने शार्दुल ठाकुरला रिलीज केलं आहे. त्यामुळे त्याची जागा भरून काढण्याासाठी अनुभवी गोलंदाजाची गरज आहे.

मोहम्मद शमी 2013 पासून आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. त्याने मागच्या 12 वर्षात 119 सामने खेळले असून 133 विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरीन 28.19 ची असून इकोनॉमी रेट हा 8.63 आहे. त्याने 2022 आणि 2023 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने 2022 मध्ये 20 आणि 2023 मध्ये 28 विकेट काढल्या होत्या. मात्र मागच्या काही वर्षात त्याला दुखापतीने ग्रासलं आहे. त्यामुळे त्याच्या खेळावर परिणाम होत आहे. सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. मात्र टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.