AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना खूशखबर, या दिवशी मैदानात खेळण्याची शक्यता

आयपीएल 2026 स्पर्धेत साखळी फेरीचे काही सामने शिल्लक आहेत. त्यामुळे प्लेऑफची चुरस वाढली आहे. चेन्नई सुपर किंग्स देखील प्लेऑफच्या शर्यतीत आहे. असं असताना चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना खूशखबर, या दिवशी मैदानात खेळण्याची शक्यता
MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना खूशखबर, या दिवशी मैदानात खेळण्याची शक्यताImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 12, 2026 | 7:39 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात काही चांगली झाली नाही. पराभवाच्या मालिकेनंतर चेन्नई सुपर किंग्स संघ विजयाच्या ट्रॅकवर परतला आहे. इतकंच काय तर प्लेऑपच्या शर्यतीतही आहे. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 11 सामने खेळले असून त्यापैकी 6 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या पारड्यात 12 गुण असून पाचव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्सचे 12 आणि आणि +0.185 नेट रनरेट आहे. त्यामुळे उर्वरित तीन पैकी 2 सामन्यात विजय मिळवताच प्लेऑफचं स्थान पक्कं होईल. असं असताना चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. महेंद्रसिंह धोनी फिट अँड फाईन असल्याचं समोर आलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर महेंद्रसिंह धोनी फक्त आयपीएल स्पर्धा खेळतो. पण यंदाच्या पर्वात एकही सामना खेळलेला नाही.

आयपीएल 2026 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी मैदानात कधी उतरणार याची उत्सुकता लागून आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याच्या पोटरीला दुखापत झाली होती. त्यामुळे सुरूवातीला दोन आठवडे खेळणार नाही असं सांगितलं गेलं. पण मागच्या दीड महिन्यापासून मैदानात उतरलेला नाही. आता महेंद्रसिंह धोनीच्या पुनरागमनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रेव्हस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्स संघासोबत लखनौला जाणार आहे. 15 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. या सामन्यासाठी संघ आणि स्टाफ 13 मे रोजी लखनौला जाणार आहे.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यासाठी संघासोबत महेंद्रसिंह धोनी जाणार असल्याने चांगले संकेत आहेत. त्यामुळे प्लेइंग 11 किंवा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून स्थान मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. पण सध्या प्लेऑफची शर्यत तीव्र असल्याने संधी मिळेल की नाही यााबाबत शंका आहे. कारण तीन पैकी 2 सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफचं तिकीट मिळेल. अशा स्थितीत संघाचं बांधणी विस्कळीत करण्याची चूक संघ व्यवस्थापन करेल असं वाटत नाही. एकंदरीत महेंद्रसिंह धोनीचं फिटनेस पाहता हे त्याच्यासाठी शेवटचं पर्व ठरू शकते.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!