Ashes : मार्नस लॅबुशेन विचित्र पद्धतीने बाद, Video पाहून म्हणाल, “ऐसा कौन आऊट होता है भाई?”

इंग्लंडविरुद्धच्या Ashes मालिकेतील 5 व्या कसोटी सामन्यात (AUS vs ENG 5th Test) ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. होबार्टमध्ये झालेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी यजमानांच्या 3 विकेट 12 धावांवर पडल्या.

Ashes : मार्नस लॅबुशेन विचित्र पद्धतीने बाद, Video पाहून म्हणाल, "ऐसा कौन आऊट होता है भाई?"
Marnus Labuschagne (फोटो : आयसीसी ट्विटर)

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या Ashes मालिकेतील 5 व्या कसोटी सामन्यात (AUS vs ENG 5th Test) ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. होबार्टमध्ये झालेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी यजमानांच्या 3 विकेट 12 धावांवर पडल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्नस लॅबुशेनने (Marnus Labuschagne) 44 धावा जोडल्या पण तो स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) चेंडूवर अतिशय विचित्र पद्धतीने बाद झाला. लबुशेन इतक्या विचित्र प्रकारे आऊट झाला की त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मार्नस लॅबुशेन हा संघाची चौथी विकेट म्हणून बाद झाला. मात्र, ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आणि त्यांच्या 2 विकेट केवळ 7 धावांवर पडल्या. लॅबुशेन तिसऱ्या क्रमांकावर उतरला आणि त्याने 44 धावा जोडल्या. त्याने 53 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार फटकावले. स्टुअर्ट ब्रॉड डावाच्या 23 व्या षटकात आला. लॅबुशेनला पहिल्याच चेंडूवर शॉट खेळायचा होता पण तो ऑफ-स्टंपच्या दिशेने खूप पुढे गेला आणि बेल्स विखुरल्या.

लॅबुशेनने चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीच समजलं नाही. चेंडू मागे स्टम्पला लागला आणि लॅबूशेन जमिनीवर कोसळला. हे पाहून प्रेक्षकही अचंबित झाले. सोशल मीडियावर याचे विचित्र विकेट म्हणूनही वर्णन केले जात आहे. अनेक दिग्गजांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. लॅबुशेन आणि हेड यांच्यात चौथ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारीही झाली. हेडने 113 चेंडूत 12 चौकार मारले. ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावले आणि 101 धावांची खेळी खेळली. पहिले 3 कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने सध्याची 5 सामन्यांची अॅशेस मालिका आधीच जिंकली आहे.

इतर बातम्या

IND vs SA: ‘बाहेरच्या लोकांना माहित नसतं, मैदानात काय…’, विराटचं DRS वादावर मोठ विधान

IND vs SA: ‘ओय एक मॅच तो अच्छा खेल के जाओ’, कॅच सुटली नेटीझन्सनी पुजाराची वाट लावली

IND vs SA: 30 वर्षात धोनीच्या नेतृत्वातच टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेत सरस कामगिरी, जाणून घ्या रेकॉर्ड

(Marnus Labuschagne Slips And Loses Wicket To Stuart Broad, watch Video)

Published On - 12:37 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI