AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi : वैभव टी 20 डेब्यूसाठी सज्ज, ब्लु जर्सीत केव्हा खेळणार पहिला सामना? पाहा वेळापत्रक

Vaibhav Suryavanshi: वैभन सूर्यवंशी याने आयपीएलमध्ये धमाका केला.त्यानंतर वैभव विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये खेळत आहे. वैभवने 19 वर्षांखालील भारतीय संघाचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. आता वैभव इंडिया ए टीमकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

Vaibhav Suryavanshi : वैभव टी 20 डेब्यूसाठी सज्ज, ब्लु जर्सीत केव्हा खेळणार पहिला सामना? पाहा वेळापत्रक
Vaibhav Suryavanshi Team IndiaImage Credit source: AP
| Updated on: Nov 11, 2025 | 5:21 PM
Share

मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याला लागू पडते. वैभवने वयाच्या 14 व्या वर्षी असंख्य विक्रम केलेत. ज्या वयात इतर मुलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेत असतात त्या वयात वैभवने क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स केलेत. वैभवने 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केलं. वैभवने त्याच्या पदार्पणातील हंगामातच इतिहास घडवला. वैभव आयपीएल स्पर्धेत वेगवान शतक करणारा पहिलावहिला भारतीय ठरला. तसेच वैभवला रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी बिहार संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. थोडक्यात काय तर वैभवने कमी वयात यशाची शिखरं पादक्रांत केली आहेत. वैभव आता त्याच्या कारकीर्दीत आणखी 1 अविस्मरणीय कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.

वैभव आता टीम इंडियाच्या ब्लु जर्सीत खेळण्यासाठी तयार आला आहे. वैभवचं लवकरच टी 20 पदार्पण होणार आहे. येत्या काही दिवसात रायजिंग स्टार आशिया कप  2025 या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. वैभवची  या स्पर्धेसाठी इंडिया ए टीममध्ये निवड करण्यात आली आहे. तर अमरावतीचा विकेटीकपर बॅट्समन जितेश शर्मा इंडिया ए संघाचं नेतृत्व करणार आहे. टी 20i आशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेला येत्या 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. वैभव या स्पर्धेत एक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

भारताचा पहिला सामना केव्हा?

आशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेत 14 ते 23 नोव्हेंबर दरम्यान 15 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये चुरस असणार आहे. टीम इंडिया या मोहिमेतील आपला पहिलाच सामना हा 14 नोव्हेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. वैभवने भारताचं 19 वर्षाखालील एकदिवसीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र वैभवची टी 20 क्रिकेटमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. या सामन्यात वैभवला संधी मिळाल्यास त्याचं पदार्पण होईल. अशाप्रकारे वैभवची ब्लु जर्सीत खेळण्याची ही पहिली वेळ ठरेल.

वैभवची टी 20 कारकीर्द

वैभवने आतापर्यंत 8 टी 20 सामने खेळले आहेत. वैभवने या 8 सामन्यांमध्ये 265 धावा केल्या आहेत. वैभवने 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. तसेच वैभवने टी 20 क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं आहे.

इंडिया ए चं वेळापत्रक

पहिला सामना, विरुद्ध यूएई, शुक्रवार, 14 नोव्हेंबर

दुसरा सामना, विरुद्ध पाकिस्तान, रविवार 19 नोव्हेंबर

तिसरा सामना, विरुद्ध ओमान, मंगळवार 18 नोव्हेंबर

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.