Suryakumar Yadav चा वानखेडेत धुमधडाका, आरसीबी विरुद्ध 17 बॉलमध्ये तुफानी फिफ्टी
Suryakumar Yadav Fifty MI vs RCB IPL 2024 : सूर्यकुमार यादव आयपीएलच्या 17 व्या मोसमात कमबॅक करताना अपयशी ठरला. मात्र आरसीबी विरुद्ध सूर्यकुमारने स्फोटक अर्धशतक भरपाई केली आहे.

सूर्यकुमार यादव याने दुखापतीनंतर आयपीएलच्या 17 व्या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कमबॅक केलं. सूर्या या सामन्यात अपयशी ठरला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. मात्र सूर्याने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात पूर्णपणे भरपाई केली आहे.सूर्यकुमारने बंगळुरु विरुद्ध 197 धावांचा पाठलाग करताना झंझावाती अर्धशतक ठोकलं आहे. सूर्यकुमारने आरसीबीच्या गोलंदाजाना झोडून काढला. सूर्याने आपल्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये अर्धशतक ठोकलं. सूर्याचं हे 17 व्या मोसमातील पहिलं आणि आयपीएल कारकीर्दीतील 22 वं अर्धशतक ठरलं.
सूर्यकुमारने फक्त 17 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने 305 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकलं. सूर्याने चौकार आणि षटकारांच्या मदतीने एकूण 9 बॉलमध्ये 44 धावा ठोकल्या. सूर्याच्या अर्धशतकानंतर वानखेडे स्टेडियमधील क्रिकेट चाहत्यांनी सॅल्यूट ठोकला. इतकंच नाही, तर सचिन तेंडुलकर यानेही सूर्याच्या या अर्धशतकी खेळीचं कौतुक केलं.
सूर्यकुमार यादवला अर्धशतकानंतर फिनीशिंग टच देऊन नाबाद परतण्याची संधी होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. सूर्या अर्धशतक ठोकल्यानंतर तिसऱ्या बॉलवर आऊट झाला. सूर्याला विजयकुमार वैशाख याने महिपाल लोमरुर याच्या हाती कॅच आऊट केलं. सूर्याने 19 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 5 फोरसह 273.68 च्या स्ट्राईक रेटने 52 धावांची खेळी केली. सूर्याच्या या खेळीची क्रिकेट चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. सूर्याने ही खेळी करुन चाहत्यांचीही प्रतिक्षा संपवली.
तोडफोड सूर्यकुमार यादव
ICYMI – Surya lighting up the night SKY with a flurry of SIXES 🔥🔥🔥
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #MIvRCB | @surya_14kumar pic.twitter.com/7CiLtcwTyI
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2024
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी आणि आकाश मधवाल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.
