AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : हार्दिक कॅप्टन्सीसाठी अयोग्य, रोहितला नेतृत्व द्या, कुणाची मागणी? व्हीडिओ

Mumbai Indians IPL 2026 : हार्दिक पंड्या याला हटवून त्याच्या जागी रोहितला पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे. व्हीडिओत पाहा एका चाहत्याने नेतृत्वातबाबत काय म्हटलंय.

IPL 2026 : हार्दिक कॅप्टन्सीसाठी अयोग्य, रोहितला नेतृत्व द्या, कुणाची मागणी? व्हीडिओ
Rohit Sharma and Hardik Pandya Mumbai IndiansImage Credit source: Bcci and Social Media
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 24, 2026 | 5:30 AM
Share

मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियममध्ये 23 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात धावांबाबत सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला. मुंबईला चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या प्रतिष्ठेच्या आणि हायव्होल्टेज सामन्यात विजय मिळवणं सोडा संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. मुंबईने गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सवर 99 धावांनी मात करत जोरदार कमबॅक केलं होतं. मुंबईला त्या विजयामुळे नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला होता. मात्र मुंबईला चेन्नई विरुद्ध त्यापेक्षा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा डाव हा 19 ओव्हरमध्ये 104 धावांवर आटोपला. मुंबईच्या या पराभवाला कर्णधार हार्दिक पंड्या याला जबाबदार ठरवलं जात आहे. त्यामुळे कॅप्टन हार्दिकला बदलून त्याच्या जागी रोहितला पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

मुंबईच्या फलंदाजांनी या सामन्यात निराशा केली. मात्र कॅप्टन म्हणून हार्दिकही चुकलाच, हे विसरून चालणार नाही. हार्दिकला कॅप्टन म्हणून टाईमिंग साधता येत नसल्याचं म्हटलं जात आहे. योग्य वेळेस योग्य गोलंदाजाला बॉलिंग देण्याचा निर्णय हार्दिकला करता येत नाहीय. तसेच हार्दिक फलंदाज म्हणूनही अपयशी ठरतोय. तसेच हार्दिकच्या नेतृत्वात अभाव आहे, असंही चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मुंबईच्या विजयासाठी रोहित शर्माच कॅप्टन हवा, असं ठाम मत नेटकरी आणि पलटणच्या चाहत्यांचं आहे.

पहिली गोष्ट तर मुंबईच्या चाहत्यांना हार्दिकला कर्णधार करणं हीच गोष्ट मुळात पटलेली नाहीय. त्यात हार्दिकची निर्णय क्षमता, गोलंदांजाचा योग्य वापर न करणं आणि फलंदाजीत अपयश हे मुद्दे नमूद होत आहेत. त्यामुळे हार्दिक कॅप्टन म्हणून नकोच, अशी भूमिका पलटण आण रोहित समर्थकांची आहे.

हार्दिकच्या नेतृत्वात पलटणसोबत काय झालं?

हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईला आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील धावांबाबत आपल्या सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने मुंबईचा 103 धावांनी धुव्वा उडवला. चेन्नई मुंबईला 100 किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी पराभूत करणारी पहिलीच टीम ठरली. त्यातही मुंबईला आपल्या घरच्या मैदानात हा पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे पलटणच्या चाहत्यांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे.

हार्दिकवर चाहत्यांकडून टीका

दरम्यान मुंबईच्या या पराभवानंतर हार्दिक पंड्यावर नेटकऱ्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. क्रिकेट चाहत्यांनी हार्दिकवर अनेक मुद्द्यांवरुन निशाणा साधला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल