AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs SRH : हैदराबाद नवव्या सामन्यासाठी सज्ज, पलटण विरुद्ध परतफेड करण्याची संधी, मुंबई कमबॅक करणार?

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Preview : सनरायजर्स हैदराबाद गेल्या सामन्यात जिंकली आहे. तर मुंबईला पराभूत व्हावं लागलंय. तसेच मुंबईची या हंगामातील निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्यामुळे मुंबईवर 2 गुण मिळवण्याचं अधिक दडपण आहे.

MI vs SRH : हैदराबाद नवव्या सामन्यासाठी सज्ज, पलटण विरुद्ध परतफेड करण्याची संधी, मुंबई कमबॅक करणार?
Ishan Kishan Srh IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 29, 2026 | 6:11 AM
Share

मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 41 वा सामना होणार आहे. मुंबईचा हा आठवा तर हैदराबादचा नववा सामना असणार आहे. मुंबईला आतापर्यंत 7 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. तर 5 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. मुंबई विरुद्ध हैदराबाद हा सामना पलटणच्या घरच्या मैदानात होणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये दोन्ही संघ भिडणार आहेत. मुंबईने घरच्या मैदानात सलग 3 सामने गमावले आहेत. त्यामुळे मुंबईसमोर घरच्या मैदानातील पराभवाची मालिका खंडीत करण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.

हैदराबादने आतापर्यंत 8 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. हैदराबादने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध 25 एप्रिलला 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे हैदराबादचा विश्वास दुणावलेला आहे. तर मुंबईसमोर कमबॅक करण्याचं आव्हान आहे. अशात मुंबईला 2 गुणांसाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती

ताज्या आकडेवारीनुसार, मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे. मुंबईने 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. मुंबईचा नेट रनरेट हा -0.736 असा आहे. तर हैदराबाद 10 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. हैदराबादचा नेट रनरेट हा +0.815 इतका आहे.

हैदराबाद गेल्या पराभवाचा वचपा काढणार?

हैदराबाद वानखेडे गेल्या पराभवाचा हिशोब करण्यासाठी मुंबई विरुद्ध मैदानात उतरणार आहे. गेल्या मोसमात (IPL 2025) मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात 2 सामने खेळवण्यात आले होते. तेव्हा मुंबईने दोन्ही सामन्यात ऑरेंज आर्मीला लोळवलं होतं. त्यामुळे आता मुंबई हैदराबाद विरुद्ध सलग तिसरा विजय मिळवणार की हैदराबाद 2 गुणांची कमाई करणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

वानखेडेत धावांचा पाऊस फिक्स!

वानखेडे स्टेडियम तुलनेने लहान आहे. त्यामुळे इथे हमखास 200 पेक्षा अधिक धावा होतात. तसेच 200 पेक्षा अधिक धावा चेसही होतात. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या मैदानात फटकेबाजी पाहायला मिळणार असल्याचं निश्चित आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यात हैदराबादच्या गोटात विस्फोटक फलंदाज आहेत. ट्रेव्हीस हेड आणि अभिषेक शर्मा ही आक्रमक सलामी जोडी काय करु शकते हे क्रिकेट चाहत्यांना चांगलंच माहित आहे. तसेच इशान किशनही जोरात फटकेबाजी करतोय. त्यामुळे पलटणच्या गोलंदाजांसमोर हैदराबादच्या त्रिकुटाला रोखण्याचं आव्हान असणार आहे.

Follow Us
ओमराजे गद्दारी करू नका!; सोशल मीडियावर समर्थकांचा भावनिक आक्रोश
Omraje Nimbalkar | ओमराजे गद्दारी करू नका!; सोशल मीडियावर समर्थकांचा भावनिक आक्रोश, ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण
शिंदे गटाकडे फक्त पैसा, विचार नाही!; ऑपरेशन टायगरवरून दानवेंचा घणाघात
Ambadas Danve । शिंदे गटाकडे फक्त पैसा, विचार नाही!; ऑपरेशन टायगरवरून अंबादास दानवेंचा घणाघात
मी जबाबदारी घेतो म्हणत चक्क... ओमराजे निंबाळकरांना दिल्लीला नेणारा बडा
मी जबाबदारी घेतो म्हणत चक्क... ओमराजे निंबाळकरांना दिल्लीला नेणारा बडा मंत्री?
गद्दारी कराल तर याद राखा!; खासदारांच्या फुटीच्या चर्चेत राऊतांचा इशारा
Sanjay Raut UNUCT | गद्दारी कराल तर याद राखा!; खासदारांच्या फुटीच्या चर्चेत संजय राऊतांचा थेट इशारा
त्या प्रकरणासाठी ओमराजे निंबाळकरांवर दबाव, संजय राऊतांनी सांगूनच टाकलं
Omraje Nimbalkar | त्या प्रकरणासाठी ओमराजे निंबाळकरांवर दबाव, संजय राऊतांनी सांगूनच टाकलं
15- 15 कोटी मिळेपर्यंत ते चार्टेड विमानतही चढले नव्हते अन्... संजय
15-15 कोटी मिळेपर्यंत ते चार्टेड विमानतही चढले नव्हते अन्... संजय राऊतांनांचा मोठा दावा, थेट...
50 कोटींचा हमी भाव, 15-15 कोटी आधी!; संजय राऊतांचा खासदार खरेदीवर मोठा
Sanjay Raut । 50 कोटींचा हमी भाव, 15-15 कोटी आधी!; संजय राऊतांचा खासदार खरेदीवर मोठा गौप्यस्फोट
ऑपरेशन टायगरला झटका! 100 कोटींचं आमिष नाकारून राजाभाऊ वाजे ठाकरेंसोबतच
Rajabhau Waje | ऑपरेशन टायगरला झटका! 100 कोटींचं आमिष नाकारून राजाभाऊ वाजे ठाकरेंसोबतच
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा डाव
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा डाव, अरविंद सावंतांच्या माध्यमातून थेट... दिल्लीत काय घडतंय?
मुख्यमंत्रिपदासाठी भस्मासूर निर्माण केला; अंधारेंचा स्फोटक दावा
Sushma Andhare On BJP | मुख्यमंत्रिपदासाठी भस्मासूर निर्माण केला...; 6 खासदारांच्या बंडाच्या चर्चांदरम्यान सुषमा अंधारेंचा स्फोटक दावा!